मुंबई: अपक्ष आमदार देवेंद्र महादेवराव भुयार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. तसेच अजित पवार यांना भुयार यांनी पाठिंबा जाहीर केला आहे.
वाय.बी. चव्हाण केंद्रात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बैठकीला भुयार यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे भुयार सकाळी शरद पवारांकडे तर, दुपारी अजित पवारांकडे दिसुन आल्याने चर्चेला उधाण आले आहे.
अवघ्या काही तासांत देवेंद्र भुयार यांनी यूटर्न घेतला आहे. त्यामुळे शरद पवार गटाला हा मोठा धक्का समजला जात आहे.
Maharashtra | Independent MLA Devendra Mahadevrao Bhuyar met Deputy CM Ajit Pawar at his residence in Mumbai today
Bhuyar was present at NCP President Sharad Pawar's meeting held at YB Chavan Centre, earlier today. pic.twitter.com/T15h4ZOeRH
— ANI (@ANI) July 5, 2023
देवेंद्र भुयार हे अमरावती जिल्ह्यातील मोर्शी-वरुड मतदारसंघातून स्वाभिमानी पक्षाकडून निवडून आले आहेत. महाविकास आघाडीत ते दाखल झाले होते. त्यामुळे पक्षशिस्तीचे उल्लंघन केल्याने त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आलेले आहे. ते अपक्ष आमदार म्हणून गणले जातात. अजित पवार यांना राष्ट्रवादीच्या ३७ आमदारांचे समर्थन आवश्यक आहे.