मुंबई: महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि समविचारी संघटनांकडून मुंबई महामोर्चाच आयोजन करण्यात आलं असून उद्धव ठाकरे अजित पवार आणि नाना पटोले या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत महाविकास आघाडीच्या महामोर्चाला भाजपा माफी मांगो आंदोलनाने उत्तर देणार आहे.
महाविकास आघाडीचा हा महामोर्चा भायखळ्यातील रिचर्ड सन्स अँड क्रूडास कंपनी ते सीएसएमटी रेल्वे स्टेशनपर्यंत (टाईम्स ऑफ इंडिया) असणार आहे. या पार्श्वभूमीवर अडीच हजार पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे.
या महामोर्चात समविचारी पक्ष, महाराष्ट्र प्रेमी महापुरुषांना माणणारे सुद्धा सामील होणार आहेत. या महामोर्चात कोणताही अनुचित प्रकार घडून नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.