मुंबई: महापुरुषांचा अवमान झाल्याच्या निषेधार्थ आज मुंबईतील क्रुडास कंपनीपासून भायखळ्यातील टाइम्स ऑफ इंडिया च्या कार्यालयापर्यंत हा मोर्चा जाणार असून मोर्चाच्या शेवटी जाहीर सभेने या मोर्चाची सांगता होणार आहे.
उद्धव ठाकरे अजित पवार आणि नाना पटोले या मोर्चाचं नेतृत्व करणार असून दुपारी साडेबारा वाजता शरद पवार या मोर्चाच्या ठिकाणी जात सभेला संबोधित करणार आहेत.
आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे या मोर्चाच्या दिशेने रवाना झाले असून अवघ्या काही वेळात या विराट अशा महामोर्चाला सुरुवात होणार आहे.