मुंबई : महायुतीमधील जागा वाटपासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीचा दौरा करणार असून लवकरच महायुतीच्या सर्व जागांचं वाटप होईल आणि उमेदवार जाहीर केले जातील असं सांगितलं जात आहे. यादरम्यान जागावाटपासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकसभेच्या जागा जिंकतील की तो विजय उद्धव ठाकरेंना कानफाटीत मारल्यासारखा असेल असे रामदास कदम म्हणाले आहेत.
नेमके काय म्हणाले उद्धव ठाकरे?
मुंबईमध्ये प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी चर्चा करताना रामदास कदमांनी लवकरच एकनाथ शिंदे गटाच्या उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल असा विश्वास व्यक्त केला. “पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांची यादी आपल्याला पाहायला मिळेल. ती यादी अतिशय समाधानकारक असेल. त्यामध्ये कुठलीही अडचण नसणार. शिवसेना-भाजपा युती आजची किंवा कालची नाही. ही युती भावनात्मक दृष्टीने जोडलेली आहे. या युतीचा निश्चितपणे सन्मान केला जाईल. उद्धव ठाकरेंना कानफाटीत बसेल अशा जागा महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे पुन्हा आणून दाखवतील, हा विश्वास व्यक्त करतो,” असे रामदास कदम म्हणाले आहेत.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Pune News : पुण्याच्या जुन्नरमध्ये एकाचवेळी आढळले 3 बिबटे; धक्कादायक Video आला समोर
Loksabha Election : उद्या दुपारी 3 वाजल्यापासून आचारसंहिता लागू होणार
Paytm Payments Bank : पेटीएम पेमेंट्स बँकेसाठी आज अंतिम मुदत
Jalgaon News : शिवलिंग घेण्यासाठी निघालेल्या भाविकांचा दुर्दैवी मृत्यू
Suhas Patil : इंद्रायणी बालन फाऊंडेशन, पुनित बालन ग्रूपचे कार्य वाखाणण्याजोगे : सुहास पाटील
Pune Fire : पुण्यात गॅरेजमधील 17 चारचाकी वाहनांना भीषण आग
Svastikasana : स्वस्तिकासन म्हणजे काय? त्याचे फायदे काय आहेत?