Vinod Tawde

Lok Sabha Election 2024 : आयारामांना आळा घालण्यासाठी भाजपची मोठी खेळी; विनोद तावडेंवर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

486 0

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून खास रणनिती (Lok Sabha Election 2024) आखली जात आहे. निवडणुकीच्या तोंडावर पक्षात इनकमिंग होतं, त्यासाठी केंद्रीय भाजपनं मोठा निर्णय घेतला आहे. दुसऱ्या पक्षातून भाजपमध्ये येणाऱ्या नेत्यांबाबत निर्णय घेण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचे संयोजकपद महाराष्ट्रातील विनोद तावडे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. दुसऱ्या पक्षातून येणाऱ्या राजकीय नेत्यांबाबत ही समिती निर्णय घेणार आहे.

विनोद तावडेंवर सोपवली ‘ही’ जबाबदारी
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून महत्त्वाची समिती स्थापन करण्यात आली आहे. आयारामांना आळा घालण्यासाठी केंद्रीय भाजपनं मोठा निर्णय घेतला आहे. समितीचे संयोजकपद विनोद तावडेंकडे दिले आहे. दुसऱ्या पक्षातून येणाऱ्या राजकीय नेत्यांबाबत समिती निर्णय घेणार आहे.

‘या’ समितीमध्ये कोणाकोणाचा असणार समावेश?
भाजपकडून आठ जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. दुसऱ्या पक्षातील नेत्यांच्या प्रवेशाबाबत आठ जणांची समिती अंतिम निर्णय घेणार आहे. याचं संयोजकपद विनोद तावडे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. आठ जणांमध्ये चार केंद्रीय मंत्र्यांचा समावेश भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान, अश्विनी वैष्णव, मनसुख मांडवीया यांचा समावेश आहे. तीन राष्ट्रीय महासचिव म्हणजेच विनोद तावडे, तरुण चूग आणि सुनील बंसल यांचा समावेश करण्यात आला आहे. समितीमध्ये आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनाही स्थान देण्यात आले आहे. या समितीच्या अंतर्गत प्रत्येक राज्यात एक समिती बनवली जाणार आहे, जी इतर नेत्यांच्या भाजपा पक्षप्रवेश बाबत निर्णय घेईल. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याकडून आज या समितीची घोषणा करण्यात आली.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले ‘हे’ महत्वाचे निर्णय

MLA Disqualification Case : आमदार अपात्रतेच्या निकालाअगोदर राज्यातील प्रमुख नेत्यांनी दिल्या ‘या’ प्रतिक्रिया

Shiv Sena MLA Disqualification Case : निकालाला अवघे काही तास शिल्लक ! ‘या’ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार

Pune News : सारथी, बार्टी, महाज्योतीचा पेपर फुटला; विद्यार्थ्यांनी परीक्षेवर टाकला बहिष्कार

Charminar Express : चारमीनार एक्स्प्रेसचे 3 डबे रुळावरुन घसरले; 5 जण जखमी

Pune Accident : ‘त्या’ एका बाईकच्या नो एन्ट्रीमुळे निष्पाप तरुणाचा डंपरखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

Pankaja Munde : पंकजा मुंडेंना मोठा धक्का ! वैद्यनाथ कारखान्याचा ‘या’ दिवशी होणार लिलाव

Shiv Sena MLA Disqualification : कोणत्याही बाजूने निकाल लागला तरी ‘या’ 2 आमदारांची आमदारकी राहणार कायम

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide