मुंबई : अवघ्या महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष लागलेल्या शिवसेना आमदार अपात्र सुनावणीच्या निकालाला (Shiv Sena MLA Disqualification Case) काही मिनिटांमध्ये सुरुवात होईल. या निकालाकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. शिवसेना आमदार अपात्रतेच्या याचिकेवर निर्णय घेण्यासाठी सुप्रीम कोर्टाने दिलेली मुदतवाढ आज संपली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर या अपात्रता सुनावणीचा निकाल जाहीर करणार आहेत. हा निकाल तुम्हाला टॉप न्यूज मराठीवर लाईव्ह पाहता येणार आहे.