राज्यात आचारसंहिता लागू होण्याच्या दीड तास अगोदर राज्यपाल नियुक्त सात आमदारांची वर्णी लागली यामध्ये भाजपाकडून महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील आणि पोहरादेवी गडाचे विश्वस्त धर्मगुरू बाबूसिंग महाराज राठोड, शिंदेंच्या शिवसेनेकडून मनीषा कायंदे आणि माजी खासदार हेमंत पाटील तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ आणि सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे माजी महापौर इंद्रिस नायकवडी यांची वर्णी लागली.
राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या आमदारांमध्ये राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या नावाची ही चर्चा होती मत्र रूपाली चाकणकर यांची राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये वर्णी लागली नाही मात्र अवघ्या काही तासातच महायुती सरकारकडून रूपाली चाकणकरांना मोठं गिफ्ट मिळालं आणि त्यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती झाली. पुढील तीन वर्षासाठी रूपाली चाकणकर या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असणार आहेत