‘चर्चा विधानसभेची आढावा मतदारसंघाचा’ काँग्रेसचे संग्राम थोपटे विजयाचा चौकार मारणार की महायुती बाजी मारणार?

63 0

राज्यात अवघ्या काही दिवसांमध्ये विधानसभा निवडणुकीचे पडघम वाचणार आहे सर्वच पक्ष मोठ्या प्रमाणावर मोर्चेबांधणी करत असताना पाहायला मिळत आहे महाराष्ट्र मध्ये विधानसभेचे एकूण 288 विधानसभा मतदारसंघ असून या 288 मतदारसंघांमध्ये सद्यस्थिती काय आहे कोणत्या पक्षांचे आमदार आहेत मागील निवडणुकांमध्ये या मतदार संघातील गणित नेमकी कशी राहिली होती यावरचा आढावा घेणारा टॉप न्यूज मराठीचा विशेष कार्यक्रम चर्चा विधानसभेची आढावा मतदार संघाचा.


चर्चा विधानसभेचे आढावा मतदार संघाचा या विशेष कार्यक्रमांमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत राज्यातील 203 क्रमांकाचा मतदारसंघ भोर-वेल्हा-मुळशी विधानसभा मतदारसंघाबद्दल या मतदारसंघात काँग्रेसचे संग्राम थोपटे हे विद्यमान आमदार आहेत 2009 14 आणि 2019 च्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघातील लढती कशा झाल्या होत्या आणि कुणाचा विजय झाला होता पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून


  • 2009 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या संग्राम थोपटे विरोधात भाजपाचे शरद ढमाले अशी लढत झाली होती.

  •  या लढतीत संग्राम थोपटे हे 59,041 मतं मिळवत विजयी झाले

  • भाजपाच्या शरद ढमाले यांना 40,461 इतकी मतं मिळाली होती


  • 2014 च्या निवडणुकी वेळी युती व आघाडीत तुटल्यानंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसकडून संग्राम थोपटे, शिवसेनेकडून कुलदीप कोंडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विक्रम खुटवड, तर भाजपाकडून शरद ढमाले निवडणुकीच्या रिंगणात होते

  •  या निवडणुकीत काँग्रेसच्या संग्राम थोपटे यांना 78,602 मतं मिळाली आणि त्यांचा विजय झाला

  •  शिवसेनेच्या कुलदीप कोंडे यांना 59,651 मतं मिळाली होती

  •  राष्ट्रवादीच्या विक्रम खुटवड यांना 50,165 मतं मिळाली होती

  • भाजपाच्या शरद ढमाले यांना अवघी 24,440 मतं मिळाली होती


  • 2019 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून संग्राम थोपटे तर शिवसेनेकडून कुलदीप कोंडे निवडणुकीच्या रिंगणात होते

  •  या निवडणुकीत काँग्रेसच्या संग्राम थोपटे यांनी 1,089,25 मतं मिळवत तिसऱ्यांदा विजय मिळवला

  • शिवसेनेच्या कुलदीप कोंडे यांना 99,719 इतकी मतं मिळाली होती


आता आगामी 2024 च्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी कडून विद्यमान आमदार संग्राम थोपटे हेच उमेदवार असतील हे जवळपास निश्चित असून महायुतीमध्ये मात्र भाजपा आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच असल्यानं ही जागा कुणाला मिळते हे पाहणं महत्त्वाचं असेल

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!