कोल्हापूर : सध्या लोकसभा निवडणुकीची धामधुम सुरु आहे. यातच महाविकासआघाडीकडून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवाराची घोषणा केली आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांची भेट घेतली. या भेटीनंतर उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी अधिकृतपणे श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांच्या नावाची घोषणा केली.उद्धव ठाकरे आणि शाहू महाराज यांची ही भेट न्यू पॅलेस इथे झाली. यावेळी शिवसेना नेते संजय राऊत, तेजस ठाकरे, मिलिंद नार्वेकर हे नेते उपस्थित होते.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
“आज कोल्हापुरात शाहू महाराजांची भेट घेतली आहे. तुम्हाला आणखी काही सांगण्याची आवश्यकता नाही. ठाकरे कुटुंब आणि छत्रपती शाहू महाराजांचे ऋणानुबंध हे माझ्या आजोबांपासून आहेत. मला आनंद आहे की या पिढीत आणि पुढच्या पिढीतही ते घनिष्ठ राहतील. आज महाविकासआघाडीतर्फे शाहू महाराजांची उमेदवारी जाहीर झाली आहे. शिवसैनिक पूर्ण ताकदीने महाराजांना विजयी केल्याशिवाय राहणार नाही. कारण हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे. मराठी अस्मितेचा प्रश्न आहे. मी महाराजांना वचन दिलं आहे की मी प्रचाराला येणार आणि विजयाच्या सभेलाही नक्की येणार”, असे उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटले.
“मी इतकं बोलून थांबलेलो नाही, तर मी यात माझा स्वार्थ साधलेला आहे. महाराजांकडून पुढच्या संघर्षात जो आम्ही लढतोय, त्यासाठी विजय मिळवा म्हणून आशीर्वादही घेतले आहेत. त्यांचे आशीर्वाद घेऊन मी पुढे निघत आहे. यात लपवण्यासारखं काहीही नाही. आमचं जे काही असतं ते जगजाहीर असतं. आज मला खरंच आनंद वाटला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे 1997-1998 या काळात इथे आले होते. त्यानंतर मी आता इथे आलो आहे. यापुढेही मी इथे येत राहिन”, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. दरम्यान कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीतून शाहू महाराज यांना आघाडीतील सर्वच घटकपक्षांनी पाठिंबा दिला आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Pankaja Munde : बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी पुण्यात घेतली मुरलीधर मोहोळ यांची भेट
MS Dhoni : रोहित पाठोपाठ धोनीचाही झाला गेम; चेन्नईला मिळाला नवा वारसदार
Nargis Antulay : राज्याचे माजी मुख्यमंत्री ए.आर.अंतुले यांच्या पत्नी नर्गिस अंतुले यांचे निधन
Election Knowledge : निवडणुकीवेळी जप्त केलेले पैसे आणि दारूचं निवडणूक आयोग काय करतं?
Vasant More : वसंत मोरेंचं ठरलं ! पुणे लोकसभेत ‘एकला चलो रे’ चा नारा?
Sonam Wangchuck : सोनम वांगचुक यांचं पुन्हा एकदा आमरण उपोषण
Gold Rate : सोनं ‘इतक्या’ रुपयांनी महागलं
Amravati Loksabha : अमरावती भाजप लढणार, फडणवीसांनी केले स्पष्ट
Accident News : होळीसाठी गावी निघालेल्या परप्रांतीय मजुरांचा दुर्दैवी मृत्यू
Crime News : 6 वर्षांच्या चिमुकलीसह बापाने स्वतःलादेखील संपवलं