मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा दिवंगत नेते बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्या पत्नी नर्गिस अंतुले (Nargis Antulay) यांच्या पत्नीचे निधन झाले. जीवनसाथी म्हणून नर्गिस अंतुले यांनी ए. आर. अंतुले यांना भक्कम साथ दिली होती. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच राजकीय वर्तुळातून अनेक नेत्यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
कोकणचे विकासक, राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्या पत्नी नर्गिस अंतुले यांचे दुःखद निधन झाले. अंतुले साहेबांच्या जीवनात नर्गिस भाभी यांनी त्यांना भक्कम साथ दिली. त्यांच्या कुटुंबियांप्रति सहसंवेदना व्यक्त करते. त्यांच्या आत्मास चिरशांती लाभो ही ईश्वर… pic.twitter.com/KnfywrV8kO
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) March 21, 2024
राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्या पत्नी नर्गिस अंतुले यांच्या निधनाचे वृत्त दुःखदायक आहे. नर्गिस भाभी यांनी नेहमीच स्व. अंतुले साहेबांना मोलाची साथ दिली. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. भावपूर्ण श्रद्धांजली! pic.twitter.com/RXR1K19jr3
— Sunil Tatkare (@SunilTatkare) March 21, 2024
ए.आर.अंतुले यांची कारकीर्द
बॅरिस्टर ए. आर.अंतुले हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत अनेक निर्णय घेतले. शेतकऱ्यांची कर्जमाफी, बेरोजगारांना भत्ता, पोलिसांसाठी फूलपॅण्ट अशा काही धडाडीच्या निर्णयांचा यात समावेश आहे. ते एकूण 18 महिने मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर होते. त्यांच्याच कारकिर्दीत लातूद आणि सिधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली होती. विशेष म्हणजे तत्कालीन कुलाबा जिल्ह्याचे रायगड हे नामकरण अंतुले यांच्याच कार्यकाळात झाले होते. ए.आर.अंतुले यांच्या संपूर्ण कारकिर्दीत नर्गिस अंतुले पत्नी म्हणून त्यांच्यामागे ठामपणे उभ्या होत्या.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Election Knowledge : निवडणुकीवेळी जप्त केलेले पैसे आणि दारूचं निवडणूक आयोग काय करतं?
Vasant More : वसंत मोरेंचं ठरलं ! पुणे लोकसभेत ‘एकला चलो रे’ चा नारा?
Sonam Wangchuck : सोनम वांगचुक यांचं पुन्हा एकदा आमरण उपोषण
Gold Rate : सोनं ‘इतक्या’ रुपयांनी महागलं
Amravati Loksabha : अमरावती भाजप लढणार, फडणवीसांनी केले स्पष्ट
Accident News : होळीसाठी गावी निघालेल्या परप्रांतीय मजुरांचा दुर्दैवी मृत्यू
Crime News : 6 वर्षांच्या चिमुकलीसह बापाने स्वतःलादेखील संपवलं