(Chandrashekhar Bawankule)

Chandrashekhar Bawankule: योजना चालवण्यासाठी थोडा निधी घेतल्यास हरकत नाही

2693 0

मुंबई : सामाजिक न्याय विभागात समाविष्ट जातींमध्ये सुद्धा लाडक्या बहिणी आहेत. त्यामुळे कल्याणकारी योजना चालवण्यासाठी इतर खात्यांमधून थोडा, थोडा निधी वळवला असेल तर त्याला हरकत नाही, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी व्यक्त केले आहे. निधी वळविण्याला बावनकुळे यांनी एक प्रकारे समर्थन दिले आहे. 

India नं Multi front War पुकारून Pakistan चं आर्थिक कंबरडं कधीच मोडलं; Ex Brigedior Hemant Mahajan

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा सव्वा चारशे कोटींचा निधी वळविण्यात आल्याबद्दल शिवसेना, शिंदे गटाचे नेते व सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

यासंदर्भात बावनकुळे म्हणाले की, सरकारला जेव्हा एखादी योजना चालवायची असते तेव्हा त्यात सामाजिक न्याय, महसूल विभाग काम करीत असले, तरी सामूहिक निर्णय सर्वांनाच लागू होतात. त्यामुळे योजनेसाठी आदिवासी विभाग, सामाजिक न्याय विभाग अथवा महिला व बाल कल्याण अशा काही विभागातील थोडा निधी घेतल्यास त्याला काहीही हरकत नाही.

संजय शिरसाट काय बोलले, याची मला माहिती नाही. मात्र, आपण त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी म्हटले.

विकसित महाराष्ट्रासाठी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत. अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी आपला पक्ष वाढवावा, त्याला कोणाचाही आक्षेप नाही. पण सरकार म्हणून आम्ही एकत्र आहोत, असे बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा दर्शविल्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

महायुती मजबूत आहे. कुठेही बेबनाव नाही. कोणाचीही नाराजी नाही. आपल्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री व्हावा, ही प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांची भावना असते. भाजप कार्यकर्त्यांना देवेंद्र फडणवीस, शिवसेना कार्यकर्त्यांना एकनाथ शिंदे तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, असे वाटत असल्याचे बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सांगितले (The alliance is strong. There is no discord anywhere. There is no displeasure from anyone. It is the feeling of every party worker that their party leader should become the Chief Minister. BJP workers want Devendra Fadnavis, Shiv Sena workers want Eknath Shinde and NCP workers want Ajit Pawar to become the Chief Minister, said Bawankule)

Top News विशेष! Valmik Karad चा धाक, Parli ची ‘राख :’राखे’च्या ढिगाऱ्यावर उभा ‘वाल्या’च्या गुन्ह्यांचा डोलारा!

POLITICAL SPECIAL EXCLUSIVE REPORT: 1962 ते 2019 पर्यंत महाराष्ट्राच्या विधानसभेत पोहोचले तब्बल ‘इतके’ अपक्ष आमदार

TOP NEWS MARATHI SPECIAL REPORT: लेखाजोखा लोकसभेचा: पुणे,शिरूर,मावळ,बारामती लोकसभा मतदारसंघात किती आहेत मतदार संख्या?

PUNE FAKE COURT ORDER CASE: बनावट आदेश आदेश पत्रांच्या आधारे जामीन मिळवणाऱ्याला पुणे पोलिसांचा दणका; या कलमांतर्गत गुन्हा दाखल

Mumbai News : पणन महासंघाने प्राप्त उद्दिष्टानुसार खतसाठ्याची उचल केल्यानंतर आवश्यकता असल्यास कृषी विभागाने अतिरिक्त साठा मंजूर करावा

Share This News
error: Content is protected !!