मुंबई : मुंबईमध्ये आज इंडिया आघाडीची बैठक (India Meet) आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये (India Meet) देशभरातील विरोधी पक्षाचे नेते हे या बैठकीला हजर आहे. इंडिया आघाडीच्या समन्वयकपदी कुणाचा वर्णी लागणार? याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात होते. आता समन्वयकांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. मुंबईतील पंचतारांकित ग्रँड हयात हॉटेलमध्ये ही बैठक पार पडली. या बैठकीमध्ये इंडिया आघाडीची संयुक्त समितीची नावे जाहीर जाहीर करण्यात आली. राष्ट्रवादीकडून अध्यक्ष शरद पवार हे असणार आहे. तर ठाकरे गटाकडून खासदार संजय राऊत यांना जबाबदारी देण्यात आली आहे.
समन्वयकांची नावे पुढीलप्रमाणे
के सी वेणुगोपाल, शरद पवार, स्टॅलिन, संजय राऊत, तेजस्वी यादव, अभिषेने बॅनर्जी, राघव चड्डा, जावेद खान,लाल्लन सिंह,हेमेंत सोरेन,डी.राजा,ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती
लोकसभेच्या आगामी निवडणुका एकत्रितपणे लढवणार असा ठराव आजच्या बैठकीमध्ये करण्यात आला आहे. 1 सप्टेंबर 2023 रोजी आम्ही भारतातील पक्ष, याद्वारे आगामी लोकसभा निवडणुका एकत्र लढण्याचा संकल्प करतो. वेगवेगळ्या राज्यांमध्ये जागा वाटप तातडीने सुरू केली जाईल, असंही या बैठकीमध्ये ठरलं आहे.