Dhule News

Dhule News : काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याच्या सूतगिरणीवर आयकर विभागाकडून छापा

510 0

धुळे : धुळ्यामधून (Dhule News) एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांच्या सहकारी सूतगिरणीवर आयकर विभागाकडून छापा टाकण्यात आला आहे. गेल्या 24 तासांपासून त्यांची चौकशी सुरु आहे. आयकर विभागाची पथके ही नागपूर व पुणे येथील असल्याचे समजत आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार कुणाला पाटील यांच्या सहकारी सूतगिरणीवर आयकर विभागानं छापा टाकला आहे. गेल्या 24 तासांपासून ही चौकशी सुरू आहे. ही पथक नागपूर आणि पुणे येथील असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र अद्याप या वृत्ताला कोणताही दुजोरा मिळालेला नाही. काल रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती.

आयकर विभागाचं पथक सूतगिरणीतच थांबलेलं आहे. त्यामुळे आज सलग दुसऱ्या दिवशीही चौकशीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मोराणे येथील जवाहर सहकारी सूतगिरणीवर हा छापा टाकण्यात आला आहे. या छाप्याबाबत आयकर विभागाकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. आमदार कुणाल पाटील यांच्या सूतगिरणीवर धाड टाकण्यात आल्याने जिल्ह्यात आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!