बुरखा घालण्यास नकार ; पत्नीच्या हत्ये प्रकरणी डॉ. नीलम गोऱ्हे यांचे पोलीस प्रशासनाला आरोपीवर सक्त कारवाई करण्याचे निर्देश

289 0

मुंबई : टिळकनगर, मुंबई येथे दिनांक २६ सप्टेंबर रोजी रुपाली हिने बुरखा घालण्यासाठी नकार दिल्याने तिचा पती मोहम्मद ईक्बाल शेख याने तिची हत्या केली. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्वतः लक्ष घातले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना सदर प्रकरणात आरोपीला जामीन मिळणार नाही व दोषसिध्दी होईल या द्रुष्टीने सूचना देण्यासाठी विनंती केली आहे.

राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण संस्था (एनसीआरबी) च्या अहवालानुसार २०२१ मधील ४५०२६ महिला आत्महत्या पैकी ५१ % आत्महत्या कौटुंबिक हिंसाचार या कारणांमुळे झालेल्या असल्याने, राज्यातील सर्व कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात पती/ जबाबदार कुटुंबीय यांचे विरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई का केली नाही याची चौकशी करावी असे निवेदनात नमूद केले आहे.

त्याचप्रमाणे पोक्सो व कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात तात्काळ दखल घेऊन अशा प्रकारच्या केसेस तातडीने दाखल करून घेण्याबाबत कारवाई करण्यासाठी पत्र दिले आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!