” माझी अशोक चव्हाण यांच्याशी भेट झालेली नाही ” ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ‘ त्या ‘ चर्चांवर स्पष्टीकरण
पुणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांची भेट झाली असून या दोघांनी 15 ते 20 मिनिटे चर्चा केली असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात होते. दरम्यान त्यांच्या या भेटीमुळे आता काँग्रेस नेते अशोक चव्हाण देखील भाजपच्या वाटेवर आहेत का ? अशा चर्चा होत असतानाच पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व चर्चांवर पूर्णविराम दिला आहे.
दरम्यान ” माझी अशोक चव्हाण यांच्याशी भेट झालेली नाही , गणपतीच्या दर्शनाच्या निमित्ताने मी पोहोचलो आणि अशोक चव्हाण निघाले होते. ” असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल आहे .
