10 जून 1999 राज्याच्या राजकारणातील मोठा दिवस याच एका राजकीय पक्षाचा उदय राजकीय पटलावर झाला हा राजकीय पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आज राष्ट्रवादीचा 24 वा वर्धापनदिन याच निमित्तानं राष्ट्रवादीचा स्थापनेचा इतिहास जाणून घेऊयात….
महाराष्ट्राच्या सत्तेत राष्ट्रवादी नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या राष्ट्रवादीची स्थापना सोनिया गांधींच्या काँग्रेसमधील उदयानंतर झाली. सोनिया गांधींच्या विदेशीत्वचा मुद्दा शरद पवारांनी उपस्थित केला होता. तसं पत्रही त्यांनी काँग्रेस नेतृत्वाला लिहलं होतं. शरद पवारांच्या या पत्रानंतर काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीनंतर शरद पवार यांच्यासह तारिक अन्वर आणि मेघालयातील पी. एम. संगमा यांना सहा वर्षासाठी काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आले होते.
काँग्रेस पक्षानं निलंबनाची कारवाई केल्यानंतर शरद पवार यांनी बिहारमधील तारिक अन्वर आणि मेघालयातील पी. ए. संगमा यांच्या साथीने सन 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती. शिवाजी पार्क येथे पक्षाची स्थापना करण्यात आली. मुळ विचारधारा काँग्रेसची असल्यामुळं आपण आपल्या पक्षाचं नाव राष्ट्रवादी काँग्रेस ठेवावं असं ठरलं. शिवाजी पार्क येथे पहिलं अधिवेशन घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घोडदौड सुरु झाली.
आतापर्यंत राज्याच्या राजकारणात नेहमीच राष्ट्रवादी ‘किंगमेकर’ राहिल्याचं पाहायला मिळतं 2014 मध्ये महाराष्ट्रासह देशभरात मोदी लाटेच्या तडाख्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेबाहेर जावं लागलं. लोकसभेतही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र, 2019च्या विधानसभा निवणडणुकीत हे चित्र पालटले. साताऱ्यातील पावसातील वादळी सभेनं राष्ट्रवादीला एक नवी उर्जा दिली. नुकत्याच झालेल्या नागालँडच्या निवडणूकीतही राष्ट्रवादीनं आपले 7 आमदार निवडून आणले आहेत.