Hasan Mushrif

Ajit Pawar : उद्धव ठाकरेंनी अजित पवारांवर केलेल्या ‘त्या’ टीकेवर मुश्रीफांचा पलटवार

728 0

कोल्हापूर : कोल्हापूर काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची प्रकृती बिघडली होती. त्यांना डेंग्यूची लागण झाल्याचं समोर आलं. मात्र त्यानंतर बरं वाटल्यानंतर दोन दिवसांपूर्वी त्यांनी अचानक दिल्ली दौरा करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या सगळ्या घडामोडींवरून उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांना चिमटा काढला.अजितदादांशी माझा संपर्क नाही, त्यामुळे त्यांना कोणता ताप आलाय माहिती नाही. त्यांना ताप आहे की, सहकाऱ्यांचा मनस्ताप असा टोला उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांना लगावला होता. त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

काय म्हणाले हसन मुश्रीफ ?
अजित पवार यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अजित पवार हे कधीही नाटक करणारे नेते नाहीत. आत एक आणि बाहेर एक असं अजित पवार वागत नाहीत. खरोखर अजित पवार हे आजारी होते असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.

यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाबाबत छगन भुजबळ यांनी घेतलेल्या भूमिकेवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं हे छगन भुजबळ यांचे देखील मत आहे. मात्र ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावू नये असं त्यांचं म्हणणं आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide