आपला महाराष्ट्रराजकारण

वाढदिवस साजरा करण्यासाठी शिवतीर्थावर पोहोचलेल्या कार्यकर्त्यांना राज ठाकरेंनी चांगलेच सुनावले; नेमके काय घडले?

मुंबई : आज मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा वाढदिवस आहे. आज राज्यात ठिकठिकाणी मनसे कार्यकर्त्यांकडून राज ठाकरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. राज ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी कार्यकर्ते मंगळवारी मध्यरात्री शिवतीर्थाबाहेर केक घेऊन गेले होते. मात्र यावेळी उत्साहाच्या भरात घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांनी चांगलंच सुनावलं आहे.

काय म्हणाले राज ठाकरे?
आज राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे, राज ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी मध्यरात्रीच शिवतीर्थबाहेर गर्दी केली होती. मात्र घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांनी सुनावलं आहे. आवाज करू नका, जास्त आरडाओरडा करू नका. माझा नातू आजारी आहे आणि तो झोपला आहे, असे राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितल्यामुळे कार्यकर्तेदेखील शांत झाले. राज ठाकरे यांनी काल रात्री उत्तर मुंबईतील मनसे कार्यकर्त्यांसोबत वाढदिवस साजरा केला.