मुंबई : महायुतीमध्ये रायगड व नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून निर्माण झालेला वाद मिटविण्यासाठी १ मे महाराष्ट्रदिनी रायगडमध्ये आदिती तटकरे यांना तर नाशिकमध्ये गिरीश महाजन यांना झेंडावंदन करण्याचा मान देण्यात आला आहे. या दोन मंत्र्यांकडून झेंडावंदन केले जाणार असल्याने पालकमंत्री म्हणून त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे बोलले जात आहे. मात्र, झेंडावंदन केले म्हणजे, आदिती तटकरे यांना पालकमंत्रिपद दिले, असा त्याचा अर्थ होत नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना, शिंदे रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले यांनी दिली आहे. त्यावरून पालकमंत्रिपदाचा वाद अजूनही मिटला नसल्याचे दिसून आले आहे.
गोगावले म्हणाले की, आदिती तटकरे यांनी गेल्यावेळी १५ ऑगस्टला झेंडावंदन केल्यामुळे कदाचित त्यांना महाराष्ट्रदिनी झेंडावंदन करण्याची संधी मिळाली असेल. मात्र, झेंडावंदन केले म्हणून पालकमंत्रीपद मिळाले, असा त्याचा अर्थ होत नाही. काही गोष्टी एकट्याने नाही तर
वाटून घ्यायच्या असतात. त्यामुळे जे काही होईल ते चांगले होईल
भरतशेठ गोगावले म्हणाले की, पूर्वी त्यांना पालकमंत्रिपद दिले होते त्या अनुषंगाने त्यांना झेंडावंदनाचा अधिकार दिला आहे. त्यांना पालकमंत्रिपद मिळाले असे नाही, तशी शंका आणायचे काही कारण नाही. जे होईल ते चांगले होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिवसेना, शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले व राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मंत्री अदिती तटकरे यांच्यात वाद सुरुच आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी हा वाद सोडवण्यासाठी प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही.
दुसरीकडे नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून भाजपचे मंत्री गिरीश महाजन आणि शिवसेना शिंदे गटाचे मंत्री दादा भूसे यांच्यात वाद आहे. महाराष्ट्रदिनी गिरीश महाजन झेंडावंदन करणार आहेत. त्यामुळे नाशिकच्या पालकमंत्रीपदी त्यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे.
DAUND POLICE CASE: दौंडमध्ये चोरट्यांनी पोलिसांचीच केली चोरी मोबाईल, रोख रक्कम घेऊन पसार
दृश्यमपेक्षाही भयंकर प्लॅनिंग; अशोक धोडींच्या अपहरण प्रकरणाची इनसाईड स्टोरी
POLITICAL SPECIAL: विनेश फोगाट बजरंग पुनियानं काँग्रेस प्रवेशानं काँग्रेसला काय होऊ शकतात फायदे
Gold-Silver Rate : लोकसभेच्या निकालादरम्यान सोने -चांदीच्या दरांमध्ये मोठी घसरण
MANCHAR POLICE NEWS: वाद झाल्याने प्रेमीयुगूलाने चक्क कालव्यात मारली उडी; दोघेही बेपत्ता
Loksabha : नितीशकुमारांनी NDAच्या बैठकीत ‘या’ 3 मंत्री पदाची केली मागणी