महायुतीत 25 ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होणार; पाहा ‘ ह्या’ ठिकाणी होऊ शकते मैत्रीपूर्ण लढत

200 0

महायुतीमधील पक्षांमध्ये जागावाटपावरून रस्सीखेच पाहायला मिळत असून राज्यामधील 25 जागांवर माहितीत मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे.

नुकतच देशाचे गृहमंत्री अमित शहा हे दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत भाजपा 160 जागा लढण्यावर आग्रही तर शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार गटाला प्रत्येकी 64 जागा देण्याचा भाजपाचा प्रस्ताव असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ज्या जागा बाबतीत तिढा आहे अशा महाराष्ट्रातील 25 जागांवर मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. पुण्यातील वडगाव शेरी आणि इंदापूर या जागेवर मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे यांनी भाजपाचे जगदीश मुळे यांचा पराभव केला. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पुणे लोकसभेसाठी जगदीश मुळीक हे इच्छुक होते. परंतु भारतीय जनता पक्षाकडून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आली. जगदीश मोहिते देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे असल्याने देवेंद्र फडणवीस हे वडगाव शेरी मतदारसंघासाठी आग्रही असल्याची माहिती आहे. इंदापूरच्या जागेवरून अजित पवार गट आणि भाजपामध्ये रस्सीखेच सुरू आहे.अजित पवार महायुतीत असल्याने ज्याचा आमदार त्याची जागा या सूत्रानुसार ही जागा राष्ट्रवादीला मिळणार आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील नाराज असून त्यांना थांबविण्यासाठी या मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढतीचा मार्ग काढण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. करा इंदापूर मध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे आणि भाजपाचे हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये इंदापूरच्या जागेवरून रस्सीखेच सुरू आहे.

Share This News
error: Content is protected !!