नागपुर: भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे यांच्या ऑडीनं दिलेल्या धडकेत दोन तरुण जखमी झाले आहेत. दारूच्या नशेत हा अपघात झाला असल्याचं बोलला जात आहे अपघातात आत्तापर्यंत नेमकं काय घडलं TOP NEWS मराठीची ही संपूर्ण स्टोरी…
नागपुरातील सीताबर्डी भागात रविवारी झालेल्या अपघातात पाच दुचाकी आणि वाहनांना धडक बसली. या थरकाप उडवणाऱ्या अपघाताच सीसीटीव्ही फुटेजही समोर आलंय…
या अपघाताचा सीसीटीव्ही फुटेज समोर येतात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही ऑडी कार ही संकेत बावनकुळे यांच्याच नावावर असून या प्रकरणाची पोलिसांनी निष्पक्ष चौकशी करावी असं म्हटलं आहे…
दरम्यान ज्यावेळी हा अपघात झाला त्यावेळी ऑडी कारमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे, त्याचे दोन मित्र आणि ड्रायव्हर अर्जुन हावरे असल्याची माहिती मिळाली असून अपघात घडताच संकेत बावनकुळे यांनी घटनास्थळावरून पळ काढल्याचं दिसत आहे.
नागपुरात घडलेल्या या हीट अँड रन अपघातावरून राज्यात राजकारण तापलं असून पोलीस प्रशासन संकेत बावनकुळे यांना वाचवत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.
अपघातानंतर सिताबर्डी पोलिसांनी एफआयआरमध्ये संकेत बावनकुळे यांच्या नावाचा उल्लेख का केला नाही संकेत बावनकुळे यांची मेडिकल टेस्ट का झाली नाही? असा सवाल ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केलाय.
दरम्यान या प्रकरणावरून पोलीस योग्य तो तपास करत असून पोलिसांनी एफ आय आर देखील दाखल केली आहे या प्रकरणावरून राजकारण करणं चुकीचं असल्याचं मत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे
नागपुरातील सीताबर्डी या ठिकाणी झालेल्या या हिट अँड रन अपघातापूर्वी संकेत बावनकुळे कुळे यांनी बीफ कटलेट मागवले होते असा गंभीर आरोपही सुषमा अंधारे यांनी केला आहे. पोलीस तपासात ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी संकेत पावनकुळे हे ड्रायव्हर सीटच्या शेजारी असणाऱ्या सीटवर बसले होते ड्रायव्हर अर्जुन हावरे हे गाडी चालवत होते मात्र त्यांनी मद्यप्राशन केलं होतं असं उघडकीस आला आहे मात्र जर अर्जुन हावरे यांनी मद्य प्राशन केलं होतं तर संकेत बावनकुळे यांनी त्यांना गाडी चालवण्यासाठी का दिली असा सवाल आता उपस्थित होताना पाहायला मिळत आहे. या प्रकरणी पोलीस तपासातून आणखी काही बाबी उघडकीस होतात हे पाहणं ही महत्त्वाचं असणार आहे..