मागील अनेक दिवसांपासून राज्यांमध्ये भाजप नेते आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळतोय.
मनोज जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्यानंतर भाजपाकडून प्रवीण दरेकर,प्रसाद लाड, नितेश राणे असे अनेक नेते जरांगे पाटील यांच्यावरही टीका करताना पाहायला मिळत आहेत.
अशातच आता भाजपाचे विधान परिषद आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे खुलं आव्हान दिलं असून मराठा आरक्षणासाठी शरद पवार आणि महाविकास आघाडी यांनी काय केलं याचा जाब म्हणून जरांगे पाटील यांनी शरद पवारांसह महाविकास आघाडीच्या नेत्यांना विचारावा मी भाजपाचा आणि आमदारकीचा त्याग करून मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आंदोलनामध्ये सहभागी होईल असं प्रसाद लाड यांनी म्हटल आहे.