राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पडघम वाजण्यास सुरुवात असून, जागा वाटपावरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार बैठक सुरू आहेत. पुण्यात काँग्रेस पक्ष 10 जागा लढवण्यास इच्छुक आहे.
आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. प्रत्येक पक्ष हा आपल्या पारड्यात कशा अधिकच्या जागा मिळतील यासाठी प्रयत्नशील असल्यास दिसून येतंय. पुण्यात काँग्रेस पक्षाला आता विधानसभेच्या दहा जागा मिळाव्यात अशी मागणी केली आहे. पुणे शहरात आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. पुणे शहरातील शिवाजीनगर कसबा आणि पुणे कॅन्टोन्मेंट या तीन मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आहेत.
पुणे जिल्ह्यातील भोर पुरंदर या दोन जागा काँग्रेस पक्षाकडे आहेत. आता काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यातील तर पुणे शहरात दोन जागा वाढवून मिळाले असा आग्रह पक्षश्रेष्ठींकडे धरला. पुणे शहरातील पर्वती हडपसर तसेच पुणे जिल्ह्यातील खेड जुन्नर आणि दौंड या ठिकाणी पक्षाकडे सक्षम उमेदवार आहेत आणि या मतदारसंघात पक्षाची ताकद ही जास्त आहे त्यामुळे या जागा काँग्रेस पक्षाला मिळावे अशी मागणी पुणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळते.
गेल्या महिन्यात महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, तसंच प्रदेशाध्यक्ष नाना पटवले हे पुणे दौऱ्यावर आले होते त्यावेळी पुण्यातील शहर काँग्रेसच्या वतीने विधानसभा निवडणुकीत पक्षाला जागा वाढवून मिळाले अशी मागणी करण्यात आली होती. आता काँग्रेस पक्षाने पुणे शहर व पुणे जिल्ह्यातील जागा वाढवून मागितल्याने महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.