पुणे : स्वानंद महिला संस्था श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स महिला शाखा नवी दिल्ली यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या 15 व्या अखिल भारतीय स्त्री साहित्य – कला संमेलनाचे उदघाटन महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe) यांच्या हस्ते आणि स्वागताध्यक्षा आशा लुंकड, विशेष अतिथी मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ श्रीपाल सबनीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व संमेलन अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिका नीलम माणगावे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार 16 मार्च रोजी सकाळी 9.30 वाजता निगडी आकुर्डी येथील ग दि माडगूळकर नाट्यगृहामध्ये करण्यात येणार आहे. यावेळी स्वानंद पुरवणी अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
या साहित्य संमेलनामध्ये परिसंवाद, संस्था गौरव समारंभ, स्वानंद भरारी पुरस्कार,कवी संमेलन, ग्रंथदिंडी पूजन, प्रकट मुलाखत, महिलांचे कलाविष्कार, फॅशन शो आदी भरगच्च कार्यक्रमाचे सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेसात या वेळेमध्ये सादरीकरण होणार आहे. या संमेलनाचे आयोजन स्वानंद महिला संस्था, अखिल भारतीय जैन कॉन्फरन्स महिला शाखा,यांच्या मार्गदर्शनाने प्रमुख संयोजिका स्वानंदच्या संस्थापिका अध्यक्षा,साहित्यिका प्रा. सुरेखा कटारिया, स्वानंद महिला संस्थेचे अध्यक्ष शोभा बंब, सचिव सीमा गांधी यांनी आयोजन केले आहे. या साहित्य संमेलनाला पत्रकार, सामाजिक संस्था यांसह सर्वच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे अवाहन उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी केले आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Pune Accident News : पुण्यात भरधाव टँकरने तरुणाला उडवलं; CCTV फुटेज आलं समोर
Pune News : डॉ. राजेंद्र भोसले पुणे महानगरपालिकेचे नवे आयुक्त
Ramdas Kadam : ‘उद्धव ठाकरेंना कानफाटीत…’; रामदास कदम यांचे मोठे विधान
Pune News : पुण्याच्या जुन्नरमध्ये एकाचवेळी आढळले 3 बिबटे; धक्कादायक Video आला समोर
Loksabha Election : उद्या दुपारी 3 वाजल्यापासून आचारसंहिता लागू होणार
Paytm Payments Bank : पेटीएम पेमेंट्स बँकेसाठी आज अंतिम मुदत
Jalgaon News : शिवलिंग घेण्यासाठी निघालेल्या भाविकांचा दुर्दैवी मृत्यू
Suhas Patil : इंद्रायणी बालन फाऊंडेशन, पुनित बालन ग्रूपचे कार्य वाखाणण्याजोगे : सुहास पाटील
Pune Fire : पुण्यात गॅरेजमधील 17 चारचाकी वाहनांना भीषण आग
Svastikasana : स्वस्तिकासन म्हणजे काय? त्याचे फायदे काय आहेत?