मुंबई : शिवसेनेतील बंडाला एक वर्ष पूर्ण झालं आणि त्यानंतर शिवसेनेचा वर्धापन दिनही झाला. शिंदे (Eknath Shinde) आणि ठाकरे गटाकडून वेगवेगळा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यादरम्यान आता राज्याचे शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उठाव केला होता. तो यशस्वी झाला नसता तर शिंदेनी गोळी झाडून घेतली असती असा खळबळजनक गौप्यस्फोट दीपक केसरकर यांनी केला आहे.
Theft Video : सर्वांच्या डोळ्यादेखत चोरट्याने लंपास केला iPhone; चोरीची पद्धत पाहून व्हाल थक्क
नेमके काय म्हणाले दीपक केसरकर?
दीपक केसरकर मुंबईतील एका पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी बंड केले. तुम्ही कोणाला गद्दार म्हणताय? माझे आणि एकनाथ शिंदे यांच्याशी अत्यंत जवळचे संबंध आहेत. ज्या ज्या वेळी उद्धव ठाकरे वचन द्यायचे आणि तोडायचे, त्या प्रत्येकवेळी मी ती गोष्ट एकनाथ शिंदे यांना जाऊन सांगयचो. एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे की, एकनाथ शिंदे यांनी उठाव केला, त्यानंतर त्यांना वाटलं की, माझ्यासोबत ही सगळी लोकं प्रेमाने आली आहेत. ज्यादिवशी एकनाथ शिंदेंचा (Eknath Shinde) अपमान झाला तो दिवस वर्धापन दिनाचा होता. वर्धापन दिनाच्या दिवशी तुम्ही तुमच्या एक नंबरच्या शिलेदाराचा अपमान केलात, त्याला खालच्या दर्जाची वागणूक दिली. ते रागावून निघून गेले होते, तरीही त्यांची परत येण्याची तयारी होती. शिंदे साहेब हा एक सच्चा शिवसैनिक, सच्चा माणूस आहे. त्यांनी सांगितलं होतं की, मला ज्यावेळेस असं वाटायला लागलं की, माझा हा उठाव यशस्वी होणार की नाही, तेव्हा मी एकच गोष्ट केली असती. मी माझ्यासोबत आलेल्या सर्व आमदारांना परत पाठवून दिले असते. त्यानंतर मी उद्धव ठाकरे यांना एक फोन केला असता. त्यांना सांगितलं असतं की, माझी चूक झाली, पण या लोकांची काहीच चूक नाही. त्यानंतर मी स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून घेतली असती असे दीपक केसरकर म्हणाले आहेत.
केसरकरांच्या वक्तव्यावर संजय राऊतांनी दिली प्रतिक्रिया
दिपक केसरकर यांनी केलेल्या या खळबळजनक दाव्यानतंर संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले खरं म्हणजे याबद्दल पोलिसांनी दीपक केसरकरांना ताबडतोब ताब्यात घेऊन कारवाई केली पाहिजे.