पुणे : ‘काल काँग्रेसचे तात्पुरते आमदार कायम ठेकेदारांच्या गराड्यात फिरणारे रवींद्र धंगेकर यांनी भारतीय जनता पार्टी वर टीका केली. आमचे नेते चंद्रकांतदादा पाटील यांच्या वर टीका केली. मुळामध्ये जे स्वतः अधिकाऱ्यांना मारहाण करतात त्यांना आमच्या नेत्यावर बोलायचा नैतिक अधिकार नाही’ अशी प्रतिक्रिया भा ज पा चे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिली.
भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत घाटे बोलताना पुढे म्हणाले की ‘धंगेकर यांच्या कुठल्याही आरोपात तथ्य नाही गुन्हेगारी मुक्त भयमुक्त वातावरण या साठी महायुतीचे सरकार वचनबद्ध आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना गुन्हेगारी मुक्त करण्याचे कठोर आदेश दिले आहेत गृह खाते मोहोळ यांच्याविषयात योग्य ती कारवाई नक्कीच करेल परंतु धंगेकर हे सवंग लोकप्रियतेसाठी अशी विधाने सातत्याने करत असतात ते हवे ने भरलेला फुगा आहेत आणि हा फुगा लवकरच फुटेल त्यांना मुंगेरीलाल के हसीन सपने पडत आहेत.
ज्यांनी आमच्या दिवंगत आमदार मुक्ताताई टिळक यांचा 10 कोटींच्या कामाचा विरोध केला दुर्दैवाने तो निधी इतर ठिकाणी वळविला गेला ज्यांना स्वतःच्या मातदारसंघातल्या जनतेची काळजी नाही त्यांनी कोथरूड ची काळजी करावी हे खरोखर हास्यास्पद आहे. स्वतःची उमेदवारी जाहीर करून मोकळे झाले असे असले तरी आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या निवडणुकीत त्यांचा फाजील आत्मविश्वास हा नडणार आहे. चंद्रकांत दादा हे गेल्या साडेचार वर्षात मोहोळ यांना भेटले देखील नाहीत असे असताना धंगेकर यांनी केलेल्या आरोपात काहीच तथ्य नाही’. या पत्रकार परिषदेला सरचिटणीस रवींद्र साळेगावकर ,पुनीत जोशी वर्षा तापकीर संजय मयेकर पुष्कर तुळजापूरकर हेमंत लेले आदी उपस्थित होते.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Sunil Kedar : बँक घोटाळा प्रकरणी काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांना अखेर जामीन मंजूर
Amit Thackeray : मनसेमध्ये मोठा राडा ! अमित ठाकरेंवर पदाधिकाऱ्याने केला मारहाणीचा आरोप
Car Accident : माजी नगराध्यक्षाच्या मुलाच्या कार अपघाताचा CCTV आला समोर
Sharad Mohol Murder : शरद मोहोळची ‘ती’ इच्छा राहिली अपूर्ण
Nashik Accident News: स्टेअरिंग रॉड तुटल्यामुळे बसचा भीषण अपघात; नाशिकमधील घटना
Sharad Mohol Murder : शरद मोहळ हत्याकांडात मोठा खुलासा ! ‘या’ दिवशी आरोपी एकत्र आले अन् त्यानंतर…;
Latur News : भरधाव कारच्या धडकेत ‘या’ माजी नगराध्यक्षाचा मुलाचा दुर्दैवी मृत्यू
Ravindra Waikar : ठाकरेंना मोठा धक्का ! ‘या’ आमदाराच्या घरी ईडीचा छापा
Swati Mohol : माझा नवरा वाघ होता, मी वाघीण आहे, स्वाती मोहोळ यांनी घेतली आक्रमक भूमिका
Beed Crime : पतंग काढण्याच्या नादात 9 वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू