पुणे : भारतीय छात्र संसद फाऊंडेशन, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट (MIT) आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय १३वीं भारतीय छात्र संसदेचे दि.१० ते १२ जानेवारी २०२४ दरम्यान स्वामी विवेकानंद सभामंडप, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, कोथरूड, पुणे येथे आयोजन केले आहे. सन २०११ पासून दरवर्षी या छात्र संसदेचे आयोजन करण्यात येत असून, छात्र संसदेचे हे तेरावे वर्ष आहे.
महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय, तसेच, क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय आणि मानवाधिकार, लोकशाही, शांतता आणि सहिष्णुतासाठीचे युनेस्को अध्यासन यांच्या सहकार्याने ही छात्र संसद होत आहे. नॅशनल टीचर्स काँग्रेस फाउंडेशन, नॅशनल विमेन्स पार्लमेंट, सरपंच संसद यांच्या सहकार्याने ही संसद भरविण्यात येणार असून अनेक राष्ट्रीय संस्थांनीही या संसदेला पाठिंबा दिला आहे. १३व्या भारतीय छात्र संसदेचा उद्घाटन समारंभ बुधवार, दि.१० जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता भारताचे माजी उपराष्ट्रपती बैंकय्या नायडू यांच्या शुभहस्ते होणार आहे. जगप्रसिद्ध व्यावसायिक सल्लागार व लेखक प्रा. रामचरण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. शुक्रवार, दि.१२ जानेवारी २०२४ रोजी दुपारी ३.०० वाजता या संसदेचा समारोप होणार आहे. प्रेरणादायी व्याखाते डॉ. स्वामी ज्ञानवत्सल, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान आणि माजी प्रशासकीय अधिकारी व लोकसत्ता आंदोलनाचे अध्यक्ष जयप्रकाश नारायण सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
पहिले संसदेवेच्या उद्घाटन व समारोप समारंभा खेरीज या संसदेमध्ये ६ सत्रे आयोजित केली आहे ती पुहिले सत्र बुधवार दि. १० जानेवारी मारंभा दुखेरीज या संसदेमध्ये होणार आहे. सतिश युवा नेतृत्व-बक्तृत्व किंवा वास्तवारी रोजी दुपारी ३.०० वाजता समसभेचे सभापती सतिश महाना, खासदार चिराग पासवासन व बीजेपी या विषयावर उत्तर प्रदेश विभावाला आपले विचार यांब आरामद यावेळी तसेच कर्जत जामखेडबी जेधीचे राष्ट्रीय प्रवक्ता शहजाद पुमार आणि विधानपरिषदेचे तसेच सत्यजीत तांबे यांना आदर्श युवा बिच आमदार रोहित काजेंद्र सन्मानीत करण्यात येणार अहाराष्ट्रातील आदर्श उच्च शिक्षित युवा साथा विधायक सन्मान पुरस्काराने अॅड. रजिबलविन्दर सित, महाल बदिव सौ. यशोधराराजे शिंदे आमिरपंच पुरस्काराचे संजाल येथील वाहत आणि राजस्थान येथील निरू यादव यांना सन्मानीत करण्यात येणार आहे.
दुसरे सत्र गुरूवार दि.११ जानेवारी रोजी सकाळी ९.१५ बा.सुरू होणार आहे. युगांतर-संक्रमणातील तरूणाचे वारी रोजी सकाळी ९.५५ वा सुरू पौषदेचे सभापती बसवराज होराडी, व्हरमाँट विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. सुरेखा गरिमर्सटक मेध्यात्मिक गुरू व लेखक स्वामी मुकुंदानंदा आणि प्रसिद्ध इतिहासकार डॉ. विक्रम संपत आणि यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
बिहारचे आमदार चेतन आनंद यांचा आदर्श युवा विधायक सन्मान पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.
तिसरे सत्र गुरूवार दि.११ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वा. सुरू होणार आहे.
लोकशाही २.० एआय आणि सोशल मीडिया गेम कसे बदलत आहेत. या विषयावर राज्याच्या उच्च व तांत्रिक शिक्षणमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, धोरण सल्लागार आणि संशोधक डॉ. शेहला रशीद, आयएनसीचे राष्ट्रीय प्रवक्ता गुरदीप सिंग सप्पल, बीजेवायएम ११ सोशल मीडियाच्या अपूर्वा सिंग, कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष यू. टी. खादर फरीद हे विचार मांडतील.
यावेळी हरियाणाच्या हिसार, आदमपूर येथील भाजपचे आमदार भाच्या बिश्नोई यांना आदर्श युवा विधायक पुरस्काराने गौरविण्यात येईल.
चौथे सत्र गुरूवार दि.११ जानेवारी रोजी सकाळी ३.०० वा. सुरू होणार आहे. आमच्या संस्कृतीत लोककलेची शक्ती या विषयावर उत्तर प्रदेश विधान परिषदचे अध्यक्ष कुंवर मानवेंद्र सिंह, गीतकार, कवी, संवाद लेखक आणि पटकथा लेखक मनोज मुंतशीर, भारतीय गायिका मालिनी अवस्थी हे विचार मांडतील. तसेच बिहारच्या मधुबनी येथील हरलाखीचे आमदार सुधांशू शेखर व उत्तराखंडच्या बागेश्वर कपकोटचे आमदार सुरेश गरिया यांना आदर्श युवा विधायक पुरस्काराने गोरविण्यात येईल.
पाचवे सत्र शुक्रवार दि. १२ जानेवारी सकाळी ९.१५ वा. सुरू होणार आहे. डेटा, विविधता आणि लोकशाही- कास्ट जनगणना दुविधा या विषयावर मध्य प्रदेश विधानसभेचे माजी सभापती गिरीश गौतम, तमिळनाडू व पांडुचेरीचे एआयसीसीचे प्रभारी डॉ. अजॉय कुमार आणि सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीजचे संचालक डॉ. संजय कुमार, खासदार प्रा. मनोज कुमार झा, ओडिशा आपले विचार मांडतील. तसेच झारखंडच्या धनबाद येथील झरियाचे आमदार पूर्णिमा निरज सिंह आणि नोएडा येथील विधानसभा सदस्य पंकज सिंह यांना आदर्श युवा विधायक पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
सहावे सत्र शुक्रबार दि. १२ जानेवारी सकाळी ११.३० वा. सुरू होणार आहे. आपण चंद्रावर उतरलो, पण जमिनीवर महिला सुरक्षित आहेत या विषयावर पंजाब विधानसभेचे अध्यक्ष कुलतार सिंग संधवान, मुंबई उच्च न्यायालयाच्या वकील, (महिला हक आणि लैंगिक समानता) कार्यकर्त्या अॅड. आभा सिंह, भारत सरकारच्या एरोनॉटिकल सिस्टम्स (एएस), संरक्षण संशोधन आणि विकास संस्थाच्या माजी महासंचालक व प्रतिष्ठित शास्त्रज्ञ डॉ. टेसी थॉमस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शाखेच्या राष्ट्रीय अध्यक्ष व राज्यसभेच्या खासदार डॉ. फौजिया खान आणि राज्यसभेच्या माजी खासदार प्रसिद्ध अभिनेत्री व पार्श्वगायिका रूपा गांगुली हे विचार व्यक्त करतील. उत्तरप्रदेशच्या विधानसभेच्या आमदार डॉ. सुरभी व मध्य प्रदेशच्या विधानसभेच्या आमदार मनिषा सिंग यांना आदर्श युवा विधायक पुरस्काराने गौरविण्यात येईल.
भारतीय छात्र संसदेची प्रमुख वैशिष्ट्ये :
२९ राज्यांतील ४५० विद्यापीठांतील ३० हजार महाविद्यालयातून राजकीय व सामाजिक क्षेत्रात क्रियाशील विद्यार्थ्यांचा थेट सहभाग.
महाविद्यालयांच्या पातळीवर विद्यार्थ्यांची चाचणी होऊन त्यापैकी १० ते १२ हजार विद्याथ्यर्थ्यांना या छात्र संसदेत प्रत्यक्ष सहभागी करुन घेतले जाते.
२०० विद्यापीठातील ९० हजार विद्यार्थ्यांचा वेबकास्टिंगद्वारे सहभाग.
भारतातील ६ राज्यातील विधानसभांच्या सभापतींचा सहभाग.
भारतातील ६ राज्यातील संसदीय कार्यमंत्र्यांचा सहभाग.
भारतातील ६ विविध विद्यापीठातील कुलगुरूंचा सहभाग
निरनिराळ्या राज्यातील आणि विविध पक्षातील तरुण आमदारांचा सत्कार.
आदर्श मुख्यमंत्री पुरस्कार व आदर्श युवा विधायक पुरस्कार देण्यात येणार आहे.
आदर्श उच्च शिक्षित युवा सरपंच सन्मान व आदर्श युवा आध्यात्मिक गुरू सन्मान सुध्दा देण्यात येणार आहेत. अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू डॉ. रवी. चिटणीस, कुलसचिव गणेश पोकळे, सुधाकर परिमल व डॉ. गणेश मंत्री यांनी पत्रकार परिषदेत दिली. सविस्तर माहितीसाठी www.bharatiyachhatrasansad.org या संकेतस्थळांना भेट द्यावी.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Latur News : भरधाव कारच्या धडकेत ‘या’ माजी नगराध्यक्षाचा मुलाचा दुर्दैवी मृत्यू
Ravindra Waikar : ठाकरेंना मोठा धक्का ! ‘या’ आमदाराच्या घरी ईडीचा छापा
Swati Mohol : माझा नवरा वाघ होता, मी वाघीण आहे, स्वाती मोहोळ यांनी घेतली आक्रमक भूमिका
Beed Crime : पतंग काढण्याच्या नादात 9 वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IPL 2024 : मुंबई इंडियन्सला मोठा धक्का ! रोहित शर्माच्या ‘या’ हुकमी एक्क्याला झाला ‘तो’ आजार