“बाळासाहेबांच्या निर्णयावर तुम्ही बोट ठेवत आहात का ?”, फडणवीस यांचा शिवसेनेला सवाल (व्हिडिओ)

156 0

मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त संवाद साधताना काल पुन्हा भाजपवर हल्लाबोल केला. शिवसेनेची 25 वर्ष भाजपसोबत युतीत सडलो असा पुनरुच्चार केला. त्यावर बाळासाहेबांच्या निर्णयावर तुम्ही बोट ठेवत आहात का ? असा संशय आमच्या मनात येतोय, असं प्रत्युत्तर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.

फडणवीस म्हणाले की, काल उद्धव ठाकरे यांनी युतीत सडलो असं वक्तव्य केलं. 2012 पर्यंत बाळासाहेब ठाकरे युतीत होते. त्यांच्या हयातीत युती कायम ठेवली. बाळासाहेबांच्या निर्णयावर तुम्ही बोट ठेवत आहात का? असा संशय आमच्या मनात येतोय. फडणवीस म्हणाले की, तुमचा पक्ष जन्माला यायच्या आधी आमचा मुंबईत नगरसेवक होता, आमदार होते. भाजपच्या चिन्हावर लोकसभेची निवडणुक शिवसेनेने लढवली. मनोहर जोशी भाजपच्या चिन्हावर लढले होते. भाजपच्या सोबत असताना एक नंबर वर होते आणि आता चार नंबरवर आले. म्हणजे लक्षात घ्या कुणाबरोबर कोण सडलं.

तुम्ही साधं औरंगाबादचं संभाजीनगर केलं नाही. उस्मानाबादचं धाराशिव करू शकले नाहीत. तुमच्याच घोषणा होत्या ना? तिकडे भाजपने प्रयागराज करून दाखवलं. राम मंदिर मोदींनी करून दाखवलं. त्यांनी करून दाखवलं तुम्ही बोलत राहिलात. तुम्ही दुर्गाडीचा प्रश्न तरी सोडवा. तुमचं हिंदुत्व हे भाषणातलं कागदावरचं आहे. अशी टीका फडणवीस यांनी केली.

 

Share This News

Related Post

हनुमान जयंतीच्या प्रसादातून ५० जणांना विषबाधा, दोघे गंभीर, नाशिक जिल्ह्यातील घटना

Posted by - April 8, 2023 0
हनुमान जयंतीच्या महाप्रसादातून सुमारे ५० हून अधिक जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना नाशिक सुरगाणा तालुक्यातील ठाणगाव…

अमरावतीच्या रासेगागावात भरला गाढवांचा पोळा… पाहा

Posted by - August 26, 2022 0
अमरावती : गाढवाचा पोळा, हे ऐकतांना नवल वाटतंय ना मात्र हो हे खरं आहे. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यात असणाऱ्या रासेगावामध्ये…
Hingoli Accident

Hingoli Accident : दवाखान्यातून परतताना भीषण अपघात; 2 जणांचा जागीच मृत्यू

Posted by - May 4, 2024 0
हिंगोली : हिंगोलीमधून एक भीषण अपघाताची (Hingoli Accident) घटना समोर आली आहे. यामध्ये भरधाव कार रस्त्याकडेला असलेल्या झाडाला धडकल्याने भीषण…

संपाच्या 72 तासांमध्ये वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आपत्कालीन व्यवस्था पूर्णत्वास; पुणे परिमंडलामध्ये पर्यायी मनुष्यबळाद्वारे 24 तास सेवा राहणार

Posted by - January 3, 2023 0
पुणे : महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी व अभियंता संघर्ष समितीने मंगळवारी (दि. ३) मध्यरा‍त्रीनंतर ७२ तासांचा संप पुकारला आहे.…

Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंच्या भेटीसंदर्भात सुप्रिया सुळेंची टीका, म्हणाल्या…

Posted by - July 15, 2022 0
  पुणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट घेतली. तब्बल तीन तास देवेंद्र फडणवीस आणि राज…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *