राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण (व्हिडिओ)

535 0

मुंबई- मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना रूग्णसंख्या वाढत असून नेते-अभिनेत्यांपासून ते सर्वसामान्य नागरिक देखील कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राज्यसभा खासदार शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. शरद पवार यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे. कोरोना संसर्ग झाला असला तरी काळजी करण्याची गरज नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानं उपचार सुरु असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करुन घ्यावी आणि काळजी घ्यावी, असं शरद पवार यांनी आवाहन केलं आहे. गेल्या काही दिवसामंध्ये महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांना कोरोना संसर्ग झाल्याचं दिसून आलं होतं. आता शरद पवार यांना देखील कोरोना संसर्ग झाला आहे. शरद पवार यांनी ट्विटरवरुन माहिती काळजी करण्याचं कारण नसल्याचं सांगितलं आहे.

Share This News

Related Post

राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याला मारहाण ; महाविकास आघाडीमधील घटक पक्षांचे आंदोलन

Posted by - May 18, 2022 0
पुणे- राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी वैशाली नागवडे यांना भाजपकडून मारहाण झाल्याच्या निषेधार्थ महाविकासआघाडीमधील घटक पक्षांनी बालगंधर्व चौकात आज मूक आंदोलन…

#अमरावती : शिक्षक मतदार संघाचा 30 तासानंतर निकाल जाहीर; महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे विजयी

Posted by - February 3, 2023 0
अमरावती : अमरावती पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे पाटील विजयी झाले आहेत. धिरज लिंगाडे यांचा विजय निश्चित मानला…
Zeeshan Siddique

Zeeshan Siddique : काँग्रेसकडून झिशान सिद्दीकीची मुंबई युवक काँग्रेस अध्यक्षपदावरून हकालपट्टी

Posted by - February 21, 2024 0
मुंबई : काँग्रेसचे माजी वरिष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसचा हात सोडत (Zeeshan Siddique) राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश केला.…
Shivsena

Shivsena : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबत मोठी अपडेट; ‘या’ दिवशी पार पडणार सुनावणी

Posted by - September 9, 2023 0
मुंबई : शिवसेनेच्या आमदार (Shivsena) अपात्रतेप्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहामध्ये 14 सप्टेंबरला आमदारांच्या अपात्रतेबाबत मॅरेथॉन सुनावणी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *