महत्त्वाच्या मुद्द्यांपासून सामान्य जनतेचं लक्ष वळवण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न सुरू असून 5 राज्यातील निवडणुका संपताच लगेच देशातील इंधनाचे दर वाढण्यास सुरुवात झाली आहे असे म्हणत युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली.
त्याच बरोबर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री असून मुख्यमंत्र्यांचं राज्यासाठी जबरदस्त काम करत असल्याचं देखील सरदेसाई यावेळी म्हणाले. पुण्यात झालेल्या युवासेनेच्या युवासेना निश्चय दौऱ्यानंतर सरदेसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
युवासेनेचे कार्यकर्ते संघटनात्मक बांधणीसाठी सज्ज असल्याचं देखील सरदेसाई यांनी यावेळी सांगितलं