मुंबई: लोकसभा निवडणुकीमध्ये मोठी पीछेहाट झाल्यानंतर आता विधानसभेसाठी भाजपाने मास्टर प्लॅन तयार केला असून भाजपाकडून प्रमुख नेत्यांना मैदानात उतरवण्यात आलंय.
25 26 आणि 27 जुलै रोजी या नेत्यांना विभागवार दौरे करण्याच्या सूचना भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिले आहेत
कोणत्या नेत्यांकडे कोणत्या विभागाची जबाबदारी
• ठाणे आणि कोकण विभाग – रवींद्र चव्हाण
• उत्तर महाराष्ट्र – गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील
• पश्चिम महाराष्ट्र – चंद्रकांत पाटील आणि धनंजय महाडिक
• मराठवाडा – रावसाहेब दानवे आणि पंकजा मुंडे
• पूर्व विदर्भ – सुधीर मुनगंटीवार
• पश्चिम विदर्भ – संजय कुटे
• मुंबई – आशिष शेलार