Pankaja Munde

Pankaja Munde : पंकजा मुंडे यांनी पराभवानंतर दिली ‘हि’ प्रतिक्रिया; म्हणाल्या…

402 0

बीड : यंदाच्या लोकसभा निवडणूकीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणात चुरस पाहायला मिळाली. महाराष्ट्रातील जनतेने यावेळी महाविकास आघाडीच्या पारड्यात मतं टाकली. येथे महाविकास आघाडीला एकूण 30 जागा मिळाल्या आहेत. तर दुसरीडे महायुतीला अवघ्या 17 जागा मिळाल्या आहेत. यामध्ये सगळ्यात बीड या मतदारसंघात सर्वाधिक अटीतटीची लढत झाली.

या लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा पराभव झाला तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते बजरंग सोनवणे यांनी विजय मिळवला. या पराभवानंतर आता पंकज मुंडे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाल्या पंकजा मुंडे?
माझ्या आयुष्यातील सर्वांत विचित्र, वेगळी अशी ही निवडणूक होती. मी जेव्हा मतमोजणी केंद्राच्या बाहेर आले तेव्हा समोरील जमाव फारच आक्रमक होता. माझ्या आयु्ष्यात पहिल्यांदा माझ्या जमावाने कारच्या काचांना बुक्क्या मारल्या. मी विजय, पराभव सगळं पाहिलेलं आहे. पण बीड जिल्ह्यात मी असं कधी पाहिलं नाही. हेच थोडं अस्वस्थ करणारं आहे, अशा भावना पंकजा मुंडे यांनी व्यक्त केल्या.

बीडमध्ये कोणाला किती मतं मिळाली?
बजरंग सोनवणे (शरद पवार गट)- 6 लाख 83 हजार 950 मते
पंकजा मुंडे (भाजप)- 6 लाख 77 हजार 397 मते
अशोक हिंगे (वंचित)- 50 हजार 867 मते

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Maharashtra Politics : विधानपरिषदेच्या कोकण पदवीधरसाठी काँग्रेसने ‘या’ नेत्याला दिली उमेदवारी

Lok Sabha Election Result : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ‘या’ विद्यमान खासदारांचा झाला पराभव

Bajrang Sonawane Accident : बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणेंच्या कारचा भीषण अपघात

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!