Ajit Pawar

बारामती नव्हे तर ‘या’ मतदारसंघातून अजित पवार विधानसभा निवडणूक लढणार?

162 0

राज्यात विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक न लढण्याचे सूतोवाच अनेक वेळा भाषणातून केले आहेत. मात्र आता उपमुख्यमंत्री अजित पवार हे शिरूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील अशा चर्चा सुरू झाल्यात यामागील नेमकी काय कारणं आहेत पाहूया ‘TOP NEWS मराठी’च्या ‘स्पेशल रिपोर्ट’मधून….

शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये येणाऱ्या सहा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे शिरूर विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ॲड. अशोक रावसाहेब पवार हे विद्यमान आमदार आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असणारे अशोक पवार हे पुणे जिल्ह्यातील एकमेव आमदार आहेत. मागील निवडणुकांमध्ये अशोक पवार विरुद्ध बाबुराव पाचरणे अशी लढत झाली होती. मात्र बाबुराव पाचर्णे यांच्या अकाली निधनानंतर या मतदारसंघातून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद इच्छुक आहेत तर या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचाही दावा आहे. अशोक पवार यांना घेरण्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दस्तुरखुद्द अजित पवार हेच शिरूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील असं बोललं जात आहे. शिरूर विधानसभा मतदारसंघात 2009,2014 आणि 2019 या मागील तीन निवडणुकांमध्ये कशा लढती झाल्या होत्या पाहुयात

  • 2009 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीकडून अशोक पवार विरुद्ध अपक्ष बाबुराव पाचर्णे विरुद्ध भाजपाकडून मंगलदास बांदल अशी लढत झाली होती

  •  या निवडणुकीत अशोक पवार यांनी 53,936 मतं मिळवत विजय मिळवला होता

  •  अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बाबुराव पाचर्णे यांना 46, 369 मतं मिळाली होती

  • तर भाजपाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या मंगलदास बांदल यांना 37,996 इतकी मतं मिळाली होती


  • 2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये युती व आघाडी तुटल्यानंतर भाजपकडून बाबुराव पाचर्णे, राष्ट्रवादीकडून अशोक पवार, शिवसेनेकडून संजय सातव, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून संदीप भोंडवे तर काँग्रेस कडून कमलाकर सातव निवडणुकीच्या रिंगणात होते
  • या निवडणुकीत भाजपाच्या बाबुराव पाचर्णे यांनी 92,579 मतं मिळवत विजय मिळवला होता
  • राष्ट्रवादीच्या अशोक पवारांना 81,638 इतकी मतं मिळाली होती 
  • शिवसेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले संजय सातव यांना 17,187 इतकी मिळाली 
  • महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संदीप भोंडवे यांना 13, 621 इतकी मतं मिळाली 
  • काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या कमलाकर सातव यांना अवघी 4246 इतकी मतं मिळाली होती

  • 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीकडून अशोक पवार, भाजपाकडून बाबुराव पाचर्णे, वंचित बहुजन आघाडीकडून चंदन सोंडेकर तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून कैलास नरके निवडणुकीच्या रिंगणात होते. 
  • या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अशोक पवारांना 1,45,131 इतकी मतं मिळाली होती. 
  •  भाजपाच्या बाबुराव पाचर्णे यांना 1,03,627 इतकी मतं मिळाली होती 
  • वंचित बहुजन आघाडीच्या चंदन सोंडेकर यांना 3,148 इतकी मतं मिळाली होती 
  •  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कैलास नरके यांना अवघी 1,933 मतं मिळाली होती.

यासोबतच राज्यातील उमेदवार निवडीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीतील सर्वच पक्षांनी मुलाखती घेण्यास सुरूवात केली आहे. अशात भारतीय जनता पक्षाकडे असलेला पुणे जिल्ह्यातील शिरूर विधानसभा मतदारसंघात ईच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आलेल्या नाहीत. यासह हा मतदारसंघ अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता आहे. ही सर्व परिस्थिती पाहता येथून अजित पवार निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे.

दरम्यान अजित पवार हे शिरूर विधानसभा मतदार संघाबरोबरच पुतण्या रोहित पवार यांच्या विरोधात कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील अशा चर्चाही राज्याच्या राजकारणात होत असतात त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघातून लढायचं याबाबत स्वतः अजित पवार काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!