राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी कन्या अंकिता पाटील-ठाकरे यांच्यासह भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला.
या पक्षप्रवेश कार्यक्रमाला स्वतः शरद पवार उपस्थित होते. इंदापूर मध्ये झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी सुप्रिया सुळे यांच्या विजयात आमचा अदृश्य सहभाग होता असं मोठं विधान केलं आहे. यासोबतच जयंत पाटील यांच्यासोबत फोनवरून संवाद व्हायचा त्यावेळी जयंत पाटील हे का थांबला इकडे या असं म्हणत होते असंही हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं आहे.
इंदापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी हर्षवर्धन पाटील हे इच्छुक होते मात्र महायुतीमध्ये ही जागा राष्ट्रवादीच्या दत्तात्रेय भरणे यांच्या वाट्याला जाऊ शकते आणि यामुळेच हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला.
हर्षवर्धन पाटील यांच्यासह हर्षवर्धन पाटलांच्या हजारो समर्थकांनीही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे.