बारामती विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणाऱ्या अभिजीत बिचुकले यांना यंदाही अपयशाचा सामना करावा लागला आहे. वादग्रस्त विधानांसाठी आणि अनोख्या शैलीसाठी ओळखले जाणारे बिचुकले यावेळी अजित पवार यांच्याविरुद्ध रिंगणात उतरले होते. मात्र, या निवडणुकीत त्यांना केवळ 92 मते मिळाली.
बारामतीत अजित पवार यांनी मोठ्या मतांच्या संख्येने विजय मिळवला असून, त्यांना एकूण 1,78,109 मते मिळाली. बिचुकले यांनी यापूर्वी अनेक निवडणुका लढवल्या असल्या तरी आजपर्यंत कोणतीही निवडणूक ते जिंकलेले नाहीत.
बिचुकले हे “बिग बॉस” मराठी आणि हिंदी या शोमध्ये सहभागी झाले होते. त्यावेळी ते त्यांच्या वादग्रस्त विधानांसाठी चर्चेत होते.