‘मिशन पश्चिम महाराष्ट्र पूर्णत्वास’ : मुरलीधर मोहोळ

80 0

विधानसभा निवडणुकीत भाजप-महायुतीला राज्यात, पश्चिम महाराष्ट्रात आणि पुण्यात अभूतपूर्व यश मतदारांच्या साथीने मिळाले. या विश्वासाबद्दल मतदारांचे मनापासून आभार ! मतदारांचा हा कौल म्हणजे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वावर, केंद्र आणि राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजनांवर जनतेने मतांद्वारे व्यक्त केलेला विश्वास आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुशल आणि संवेदनशील नेतृत्वाचाही हा विजय आहे !

पश्चिम महाराष्ट्राच्या गडावर मतदारांनी महायुतीचा झेंडा रोवत जवळपास ५८ पैकी ४५ जागा दिल्या आहेत, हा आकडा आमचे आखलेले मिशन पूर्ण करणारा आहे. पश्चिम महाराष्ट्रात मतदारांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरविला जाईल.

पुणे शहरातील आठपैकी सात आणि जिल्ह्यातील तेरापैकी अकरा जागा महायुतीला देताना पुणेकरांनी महायुतीच्या विकासाच्या कामांवर मोहोर उमटवली आहे.

विरोधकांच्या फेक अजेंड्याला श्री. देवेंद्रजींनी दिलेले थेट उत्तर जनतेलाअधिक आश्वासक वाटल्याने मतांचे भरघोस दान महायुतीच्या पदरात मतदारांनी टाकले. मतांच्या लाचारीपोटी व्होट जिहादच्या विरोधकांच्या कारस्थानाला जनतेने धर्मयुद्धाव्दारे उत्तर देऊन एक इशाराच दिला आहे. महायुतीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदारांचे मनःपूर्वक अभिनंदन!

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!