भाजपा नेते राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री व इंदापूर विधानसभेचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील मागील अनेक दिवसांपासून भाजपा सोडण्याच्या तयारीत असल्याच्या अनेक बातम्या समोर येत आहेत.
काहीच दिवसांपूर्वी वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूटच्या गव्हर्निंग कौन्सिलची सभा सुरू असताना हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर हर्षवर्धन पाटील हे उतारी हाती घेण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांनी वेग घेतला होता.
अशातच आता सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली असून या व्हायरल झालेल्या या फोटोवरती ‘नव्या आकाशी नवी भरारी, हाती आपल्या विजयाची तुतारी’ असं लिहण्यात आलं आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा हर्षवर्धन पाटील शरद पवारांच्या पक्षात जाणार का अशा चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात हर्षवर्धन पाटील येणार अशा पद्धतीची सध्या सोशल मीडियात पोस्टर व्हायरल होत आहेत.