जम्मू-काश्मीरमध्ये आम आदमी पक्षांनं खातं उघडलं; ‘या’ मतदारसंघात मिळाला विजय

214 0

लोकसभा निवडणुकीनंतर देशात झालेल्या हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभेच्या निवडणुकीतील आज निकाल जाहीर होत असून आतापर्यंतच्या कलानुसार हरियाणा त भाजपा तर जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे.

त्यातच जम्मू काश्मीर मधून आम आदमी पक्षासाठी दिलासादायक बातमी समोर आली असून आम आदमी पक्षाने जम्मू-काश्मीरमध्ये आपलं खातं उघडलं आहे.

जम्मू काश्मीर मधील डोडा विधानसभा मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे मेराज मलिक यांचा विजय झाला आहे 4770 मतांनी मेराज मलिक यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या गजय सिंह यांचा पराभव केला आहे.

Share This News
error: Content is protected !!