मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला (Shivsena News) आज एक धक्का बसणार असल्याचं सूचक ट्विट शिवसेनेचे (Shivsena News) ठाकरे गटाचे आमदार नरेश मस्के यांनी केलं आहे. आज ठाकरे गटाचा आणखी एक मोहरा कमी होणार असून तो शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करून तो बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी निष्ठा राखणार आहे. खरा शिवसेनेचा (Shivsena News) कार्यकर्ता कधीही उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहू शकत नाही असे म्हणत नरेश मस्के यांनी एक कविता ट्विट केली आहे.
आज 'उबाठा'चा आणखी
एक मोहरा कमी होईल
खऱ्या शिवसेनेत येऊन
विचारांशी निष्ठा ठेवीलनाहीच राहू शकत तिथे
खरे कार्यकर्ते आता
स्मशान शांतता पसरणार तिकडे
मारोत कुणी काही बातासुपडा साफ होणार आणि
तुमचे उखळ पांढरे होणार
'उठा' तुमच्यावर लवकरच
झोपायची वेळ येणारED चा फेरा ठेपलाच आहे… pic.twitter.com/5PwBC1nsQk
— Naresh Mhaske (@nareshmhaske) June 27, 2023
काय म्हणाले नरेश मस्के?
नरेश मस्के यांनी कविता ट्विट केल्यामुळे ठाकरे गटाचा कोणता नेता शिंदेच्या शिवसेनेतेत (Shivsena News) प्रवेश करणार? यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. नरेश मस्के यांनी ट्विटद्वारे ठाकरे गटावर टीका केली आहे. खरा कार्यकर्ता हा कधीही उद्धव ठाकरे गटासोबत राहू शकत नाही.आज ‘उबाठा’चा आणखी एक मोहरा कमी होणार आहे. शिवसेना शिंदे गटात प्रवेश करून तो खऱ्या विचारांशी निष्ठा राखणार आहे, अशा अशायाचे ट्विट नरेश मस्के यांनी केलं आहे.
काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाच्या आमदार मनीषा कायंदे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. पण आता नरेश मस्के यांच्या ट्विटने ठाकरे गटाचा कोणता नेता शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.