Rohit Pawar

Ajit Pawar : बारामतीमधून अजितदादांविरोधात कोणला उमेदवारी? रोहित पवारांनी दिले ‘हे’ उत्तर

750 0

पुणे : काही दिवसांपूर्वी अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीमधून बंडखोरी केल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली आहे. राष्ट्रवादीचे अनेक आमदार अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटात सहभागी झाले आहेत. अजित पवारांनी आपल्या काही समर्थक आमदारांसह सरकारला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच अजित पवारांसह 8 जणांनी यादरम्यान शपथदेखील घेतली आहे. अजित पवार यांनी बंडखोरी केल्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी त्यांच्याविरोधात बारामतीमधून कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याबाबत आता आमदार रोहित पवार यांना विचारले आता त्यांनी यावर अत्यंत सावध प्रतिक्रिया दिली आहे.

BJP : भाजपकडून चार राज्यांचे नवे निवडणूक प्रभारी जाहीर ! ‘या’ मंत्र्यांवर देण्यात आली जबाबदारी

नेमके काय म्हणाले रोहित पवार?
अजित पवारांच्या विरोधात बारामतीमधून कोणीही निवडून येऊ शकत नाही. मला तिकीट दिलं तरी मी लढणार नाही. अजित पवार यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे बारामतीकर नाराज आहेत. मात्र तरीही मतदान दादांनाच होणार आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की अजित पवार यांच्याकडे सर्वाधिक पोटेंशिइल आहे. भाजपवाले लोकनेत्यांना जवळ घेतात आणि नंतर त्यांना संपवतात. मला भीती वाटते की भाजपवाले अजित पवार यांची देखील ताकद कमी करतील.

Ajit Pawar : ‘में न टायर्ड हूं, ना रिटायर्ट हूं, मैं तो फायर हूं’ शरद पवारांचा अजित पवारांना टोला

यादरम्यान त्यांनी अजित पवारांसोबत गेलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांवरदेखील निशाणा साधला आहे. नाशिकमध्ये दादांचा फोटो नव्हता. चार ते पाच लोकं दादांना व्हीलन बनवण्याचं काम करत आहेत. दादांसोबत गेलेले लोकच त्यांना व्हीलन बनवत आहेत. तसेच ज्यावेळी त्यांच्याकडे पद होतं तेव्हा त्यांनी काय केलं? असा सवालदेखील रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide