विधानसभेत अजित पवारांनी भाजप आणि शिंदे गटाचा घेतला समाचार

632 0

महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांनी निवड झाली आहे. भाजप आणि शिंदे गटाच्या 164 आमदारांनी राहुल नार्वेकर यांना मतदान केलं. राहुल नार्वेकर आणि राजन साळवी यांच्यात ही लढत होती. राहुल नार्वेकरांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन केलं. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील राहुल नार्वेकर यांना शुभेच्छा दिल्या. अजित पवारांनी अनेकांवर सडकून टीका केली.

सभागृहाचं कामकाज सुरुळीत होईल प्रभावी होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राहुल नार्वेकरांना कायद्याचं चांगलं ज्ञान आहे. नार्वेकर ज्या पक्षात जातात त्यांना आपलसं करतात. आतापर्यंत आम्ही नर्वेकरांचा जावई हट्ट पुरवला आता तुम्ही आमचे हट्ट पुरवावा अशी विनंती त्यांनी केली. तसेच, राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश केलेल्या नेत्यांवर त्यांनी टीका केली. शिंदे मला बोलले असते तर उद्धव ठाकरेंना सांगून मुख्यमंत्री केलं असतं, अशी टीका त्यांनी केली.

Share This News
error: Content is protected !!