कार्यकर्त्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये; एकनाथ शिंदेचं आवाहन

391 0

राज्यात अनेक नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर अखेर महाविकास आघाडी सरकार कोसळलं असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदासह आपल्या विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

या नंतर राज्यात अनेक अफवांना तोंड फुटलं असून याच संदर्भात एकनाथ शिंदे यांनी एक ट्विट करत कार्यकर्त्यांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केलं आहे.

“भाजपसोबत मंत्रीपदांबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका”, असं आवाहन एकनाथ शिंदे यांचं शिंदे गटाच्या आमदारांसह राज्यातील जनतेला केलं आहे.

मंत्रिपदं, खातेवाटप आणि भाजपसोबतची चर्चा याविषयी एकनाथ शिंदे यांनी ट्विट केलं आहे. ‘भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, लवकरच होईल. तोपर्यंत कृपया मंत्रिपदाच्या याद्या आणि याबाबत पसरलेल्या अफवा यावर विश्वास ठेवू नका’, असं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

Share This News
error: Content is protected !!