नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल आता समोर येऊ लागले असून पंजाब मध्ये आम आदमी पक्षाला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पंजाब मध्ये अपेक्षेपेक्षा वेगळेच चित्र पाहायला मिळत असून दिल्लीतील कामगिरीमुळे पंजाब मध्ये आम आदमी पक्षाला विजय प्राप्त झाला असल्याचे मत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा राज्यसभा खासदार शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं.
त्याच बरोबर सर्व विरोधी पक्षांशी चर्चा करून भाजपाला पर्याय देण्यावर ही विचार सुरू असल्याचे मत पवार यांनी यावेळी व्यक्त केलं
Comments are closed.