पंतप्रधान मोदींचा दिव्यांग मुलांसोबत तिकीट काढून पुणे मेट्रो प्रवास

210 0

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर असताना त्यांच्या हस्ते मेट्रोचे उद्घाटन झाले. या उदघाटन सोहळ्यात त्यांनी चक्क दिव्यांग मुलांसोबत प्रवास केला. त्यांच्यासोबत दिलखुलास गप्पा मारल्या.छत्रपती शिवाजी महाराजांच्या आसनारुढ भव्य पुतळ्याचे अनावरण केल्याच्या कार्यक्रमानंतर ते पुणे मेट्रोच्या उद्घाटनासाठी रवाना झाले.

यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री, रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार उदयनराजे भोसले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

पुणे मेट्रोचे एकूण अंतर हे 32.2 किलोमीटर आहे.आपल्या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 किलोमीटरच्या पट्ट्यात प्रवास केला. प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी पंतप्रधानांनी तिकीट खरेदी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेट्रोचा प्रवास गरवारे महाविद्यालय ते आनंदनगर असा केला. यावेळी त्यांच्यासोबत दिव्यांग विद्यार्थी उपस्थित होते. त्यांच्यासोबत त्यांनी गप्पा मारल्या. देशाच्या सर्वोच्च पदावरील व्यक्ती आपल्यासोबत अशी गप्पा मारते, हे पाहून विद्यार्थीही भारावून गेले.

https://youtu.be/bMxGXw43H2g

Share This News

Related Post

Attack on MLA Uday Samant : “ही तर कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया”…! सामंत यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर शिवसेनेतून सुभाष देसाई यांची पहिली प्रतिक्रिया..

Posted by - August 3, 2022 0
पुणे : मंगळवारी रात्री पुण्यामध्ये कात्रज परिसरात शिंदे गटाचे बंडखोर आमदार उदय सामंत यांच्यावर हल्ला करण्यात आला होता . या…

राज्यात शासकीय कर्मचाऱ्यांची अडीच लाख पदे रिक्त, माहितीच्या अधिकारातून उघड

Posted by - May 25, 2022 0
मुंबई – राज्य सरकारमधील विविध विभाग आणि जिल्हा परिषदअंतर्गत 2.44 लाखांपेक्षा अधिक पदे रिक्त असल्याचे माहितीच्या अधिकारातून उघड झाले आहे.…

TOP NEWS MARATHI SPECIAL: तात्या, एकदाचं जा तरी नाहीतर मनसेत मनापासून राहा तरी…

Posted by - December 11, 2022 0
वसंत मोरे… आक्रमक, सडेतोड, रोखठोक नेते म्हणजे वसंत मोरे… पुणे महापालिकेवर सलग तीनदा निवडून गेलेले नगरसेवक म्हणजे वसंत मोरे… पुण्यातील…

महाराष्ट्रातील देहू व पंढरपूर या दोन महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणारा पालखी मार्ग; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली पाहणी , पहा फोटो

Posted by - March 11, 2023 0
महाराष्ट्रातील देहू व पंढरपूर या दोन महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची आज केंद्रीय मंत्री नितीन…

कंत्राटी कामगारांची इशारा सभा ; ‘या’ मागण्यांसाठी करणार आंदोलन

Posted by - September 27, 2022 0
पुणे : पुणे महानगरपालिकेमध्ये सुमारे दहा हजार कंत्राटी कामगार सध्या कार्यरत आहेत.मनपाच्या वेगवेगळ्या खात्यात सुरक्षा रक्षक,वाहन चालक, पाणी पुरवठा, स्मशान…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *