पावसाळ्यात होणाऱ्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर ‘या’ 32 पर्यटनस्थळांवर जाण्यास बंदी !

410 0

पावसाळा सुरू झाला आहे. अनेक पर्यटक पावसाचा आनंद लुटण्यासाठी ठिकठिकाणी पर्यटनासाठी गर्दी करत असतात. मात्र अतिउत्साहाच्या भरात अनेक दुर्घटना घडल्याचं पाहायला मिळतं.दुर्देवाने काही प्रमाणात जीवितहानी होण्याच्या घटना घडतात. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच धबधबा, धरण व तलाव क्षेत्रात कोणत्याही प्रकारे जीवितहानी होवू नये यासाठी खालापूर व कर्जत तालुक्यातील गजबजलेल्या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी व त्यांच्या 1 कि.मी. परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आलेला आहे.

पर्यटनासाठी बंदी असलेली स्थळे खालीलप्रमाणे आहेत.

१) खांडस धरण
२) पामषाणे धरण
३) पाली भूतिवली
४) डोंगरपाडा धरण
५) बेकरे कोल्हा धबधबा
६) बेडीसगाव धबधवा
७) आनंदवाडी धवधवा
८) मोहिली धवधवा
९) आषाणे कोषाणे धबधबा
१०) पळसदरी धरण
११) कोंढाणे धवधवा
१२) अवसरे धरण
१३) साळोख धरण
१४) धामणी कातकरवाडी तलाव
१५) पोखरवाडी बंधारा बोरगाव
१६) आडोशी धवधवा व परिसर
१७) मोरबे धरण
१८) बोरगाव धबधवा
१९) कोमलवाडी धबधबा
२०) टपालवाडी धबधबा
२१) जुम्मापट्टी धबधबा
२२) वदप धबधबा
२३) पळसाचा बंधारा
२४) डोणवत धरण
२५) सोलनपाडा धरण
२६) माडप धबधबा
२७) झेनिथ धवधवा व परिसर
२८) आडोशी पाझर तलाव
२९) नढाळ / वरोसे धरण
३०) बावलें बंधारा
३१) कलोते धरण
३२) भिलवले धरण

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!