तीन नव्या शानदार एसयुव्ही लवकरच बाजारात येणार ! तुम्हाला नक्की आवडतील. पहा फीचर्स

493 0

आगामी काळात ह्युंदाई क्रेटाला टक्कर देणाऱ्या तीन नव्या एसयुव्ही लवकरच बाजारात येणार आहेत. कोणत्या कंपनीच्या या एसयुव्ही आहेत जाणून घेऊया या गाड्यांचे फीचर्स

ह्युंदाई क्रेटा गेल्या ८ वर्षापासून आपल्या सेगमेंटची टॉप सेलिंग एसयूव्ही आहे. या गाडीला सर्वाधिक पसंती मिळते. ह्युंदाई क्रेटा बरोबरच मिडसाइज सेगमेंट मध्ये किआ सेल्टॉस, मारुती सुझुकी ग्रँड विटारा आणि टाटा हॅरियर सारख्या एसयूव्ही सुद्धा आहेत. पण ग्राहकांच्या पसंतीमध्ये ह्युंदाई क्रेटा अव्वल नंबर ठरते.
प्रत्येक महिन्यात जवळपास १० हजार लोक ह्युंदाई क्रेटा खरेदी करतात. मात्र आता या गाडीला टक्कर देणाऱ्या तीन एसयूव्हीलवकरच बाजारात लॉन्च होणार आहेत.

किआ सेल्टॉस फेसलिफ्ट एसयुव्ही

किआ सेल्टॉस ४ वर्षापासून लाखो यूनिटची विक्री होत आहे. प्रत्येक महिन्यात याची चांगली विक्री होते. परंतु, काही महिन्यापासून सेल्टॉसची विक्री कमी झाली आहे. कंपनी आपल्या या पॉप्यूलर एसयूव्हीला काही कॉस्मेटिक आणि मॅकेनिकल बदला सोबत आणणार आहे. या एसयूव्ही मध्ये नवीन १.५ लीटर टर्बो पेट्रोल इंजिन पाहायला मिळेल. जे 160bhp ची पॉवर आणि 253Nm पिक टॉर्क जनरेट करेल. मीडिया रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, २०२३ किआ सेल्टॉस मध्ये अडवॉन्स्ड ड्रायव्हर असिस्टेंट सिस्टम (ADAS) सोबत अनेक फीचर्स पाहायला मिळू शकते.

होंडा मिडसाइज एसयूव्ही

होंडा आगामी जून मध्ये आपली नवीन मिडसाइज एसयूव्ही इंडियन मार्केटमध्ये लाँच करू शकते. ज्याला होंडा सिटी सेडानच्या प्लॅटफॉर्मवर बेस्ड ठेवले जाईल. ही लूक आणि डिझाइन मध्ये कंपनीची ग्लोबल एसयूव्हीशी प्रेरित असेल. या एसयूव्ही मध्ये १.५ लीटर iVTEC पेट्रोल इंजिन पाहायला मिळेल. जे 121bhp ची पॉवर जनरेट करेल. ६ स्पीड मॅन्युअल किंवा CVT गियरबॉक्स सोबत या एसयूव्हीमध्ये स्ट्राँग हायब्रिड पॉवरट्रेन पाहायला मिळू शकते. या एसयूव्हीमध्ये ADAS सोबत खूप सारे लेटेस्ट स्टँडर्ड आणि सेफ्टी फीचर्स पाहायला मिळू शकते.

सिट्रोएनची मिडसाइज एसयूव्ही

फ्रान्सची पॉप्युलर कंपनी सिट्रोएन इंडियन मार्केटमध्ये लवकरच आपली नवीन मिडसाइज एसयूव्ही आणण्याची तयारी करीत आहे. सिट्रोएन सी ३ एअरक्रॉस जवळपास ४.२ मीटर लांब असेल. याला ५ आणि ७ सीटर ऑप्शन मध्ये आणले जावू शकते. यात १.२ लीटर ३ सिलिंडर टर्बो पेट्रोल इंजिन पाहायला मिळू शकते. जे 110bhp पॉवर आणि 190Nm पिक टॉर्क जनरेट करू शकते. लूक आणि फीचर्स मध्ये ही एसयूव्ही जबरदस्त ठरू शकते.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!