मुंबई- एसटी कर्मचाऱ्यांची कमतरता भरून काढण्यासाठी एसटी महामंडळ निवृत्त वाहकांची नियुक्ती करणार आहे. राज्यात एसटी मोठ्या प्रमाणात कंत्राटी चालकांची भरती केली जात आहे.
दरम्यान, चालकांची भरती होत असताना कंडक्टर्सचीही कमतरता जाणवत आहे. त्यामुळे निवृत्त झालेल्या कंडक्टर्सना पुन्हा भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संपकरी कर्मचाऱ्यांवरून कारवाया मागे घेऊन त्यांना रुजू होण्याचे आवाहन केले जाते. त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे. याशिवाय एसटीमध्ये आणखी दोन हजार चालकही कंत्राटी पद्धतीने भरती होणार आहेत.