मुंबई – बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कटरिना कैफ यांचा ‘टायगर 3’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. याबाबत यशराज फिल्म्सकडून आज आज घोषणा करण्यात आली. या सिनेमाचा टिझर सलमान खानने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
सलमान आणि कटरिना यांनीही आपल्या सोशल मीडियावरून याबाबतची माहिती दिली आहे. टायगर 3 हा सिनेमा पुढच्या वर्षी ईदच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. 21 एप्रिल 2023 ला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. हिंदी, तमिळ आणि तेलगू या भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याचा टीझर आज प्रदर्शित झाला आहे. यात कटरिना आणि सलमान खान त्यांच्या ‘टायगर’ अंदाजात दिसत आहेत.
“सगळ्यांनी स्वत:ची काळजी घ्या, हिंदी, तमिळ आणि तेलगूमध्ये टायगर सिनेमा येणार आहे. ईदच्या दिवशी या सिनेमाच्या स्वागतासाठी सज्ज राहा”, असं सलमान आपल्या इंस्टाग्रामवरील पोस्टमध्ये म्हणाला आहे.