क्रिकेट विश्वावर शोककळा ! शेन वॉर्न याचे निधन

624 0

क्रिकेटविश्वाला हादरवणारी एक बातमी समोर आली असून. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न याचे निधन झाल्याचे वृत्त समोर येत आहे.

वॉर्न हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

१९९२मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या वॉर्नने जगातील सर्व फलंदाजांना त्याच्या तालावर नाचवले. त्याने १४५ कसोटीत ७०८ विकेट्स घेतल्या आहेत.

वन डेतही १९४ सामन्यांत त्याच्या नावावर २९३ विकेट्स आहे. त्याच्या फिरकीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने कसोटी क्रिकेटमध्ये वर्चस्व राखले होते. १९९६ व १९९९च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत त्याचा सिंहाचा वाटा होता.

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्न याचे शुक्रवारी वयाच्या 52 व्या वर्षी निधन झाले.

दरम्यान वॉर्न यांच्या निधनावर भारतीय क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

 

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!