बाजीप्रभू देशपांडे यांच्या अलौकिक शौर्याची गाथा सांगणाऱ्या ‘पावनखिंड’ चा ट्रेलर पाहा

208 0

मुंबई- पन्हाळगडाच्या वेढ्यातून निसटलेल्या छत्रपती शिवरायांना सुरक्षितपणे विशाळगडावर जाण्यासाठी स्वराज्याचे सेनापती बाजीप्रभू देशपांडे यांनी अलौकिक शौर्य दाखवत घोडखिंडीमध्ये शत्रूला रोखून धरले. त्यांच्या या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या ‘पावनखिंड’ या मराठी सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे.

या सिनेमाचे दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले असून या सिनेमात मृणाल कुलकर्णी , चिन्मय मांडलेकर, प्राजक्ता माळी, अंकित मोहन, क्षिती जोग, अजय पूरकर, समीर धर्माधिकारी आणि शिवराज वायचळ या कलाकारांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

दिग्पाल यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्याची माहिती चाहत्यांना दिली. त्यांनी पोस्ट शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले, उपसून तलवार, कधी झेलून वार, त्या रात्री सहाशे वीर, झाले जीवावर उदार ,इतिहासातल्या अभूतपूर्व लढाईची झलक, सादर आहे ‘पावनखिंड’ चे ट्रेलर! हर हर महादेव’

Share This News
error: Content is protected !!